________________
प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद
४९९
आहेत. बहुला... विकल्पेन भवति -- क्वचित् क्य प्रत्ययच लागतो, म्हणजे ज्ज (य) प्रत्यय लागतो; तत्पूर्वी सू. ३.१५९ नुसार धातूच्या अन्त्य अ चा ए होतो. उदा. नव+ज=नवेज. नविजेज, लहिज्जेज, अच्छिज्जेज -- सू.३.१७७ व १५९ पहा. अच्छ - - सू.४.२१५ पहा.
३.१६१ यथासंख्यम् -- अनुक्रमाने. डीस डुच्च -- डित् ईस आणि डित्
उच्च. दीसइ व वुच्चइ ही रूपे दृश्यते (दिस्सइ-दीसइ) व उच्यते (उच्चइ मध्ये 'व्चा आदि वर्णागम होऊन, वुच्चइ) यावरूनही साधता येतात.
३.१६२ भूतेऽर्थे....भूतार्थः -- भूतकाळाचा अर्थ दाखविण्यास जे अद्यतनी
इ. प्रत्यय संस्कृतात सांगितले आहेत, ते भूतार्थ प्रत्यय. संस्कृतमध्ये भूतकाळी अद्यतन, अनद्यतन व परोक्ष असे तीन प्रत्ययांचे गट आहेत. सी ही हीअ -- हे तृ.पु.ए.व. चे प्रत्यय दिसतात. वाङ्मयात इंसु आणि अंसु असे भूतकाळी तृ.पु.अ.व. चे प्रत्यय वापरलेले आढळतात. या खेरीज अब्बवी सारखी भूतकाळी तृ.पु.ए.व. ची रूपेही वाङ्मयात दिसतात. स्वरान्ता....विधिः -- सी, ही, हीअ प्रत्यय लागण्याचा नियम फक्त स्वरान्त धातूंच्या बाबतीतच आहे. अकार्षीत्....चकार -- कृ धातूची अद्यतन, अनद्यतन व परोक्ष भूतकाळाची संस्कृतमधील रूपे आहेत. ह्यस्तन्या: प्रयोगः -- ह्यस्तनीचा वापर. ह्यस्तनी
म्हणजे अनद्यतन भूतकाळ. ३.१६३ व्यञ्जनान्ता.... भवति -- व्यंजनान्त धातूंना भूतकाळी ईअ
प्रत्यय लागतो. येथे व्यंजनान्त म्हणजे संस्कृतमध्ये व्यंजनान्त असणारे धातू; कारण प्राकृतात व्यंजनान्त शब्दच नाहीत. अभूत्....बभूव, आसिष्ट.... आसाञ्चक्रे, अग्रहीत्.... जग्राह -- भू, आस्, ग्रह् धातूंची रूपे. सू.३.१६२ वरील अकार्षीत्.... चकार वरील टीप पहा.