________________
४९८
टीपा
प्रयोजक धातू पुढीलप्रमाणे साधले जातात – १) अ, ए, आव, आवे हे प्रयोजक धातू साधण्याचे प्रत्यय आहेत. २) अ, ए हे प्रत्यय लागताना किंवा त्यांचा लोप झाल्यास, धातूतील आदि अ चा आ होतो. उदा. कर-कार. ३) धातूचा आदि स्वर दीर्घ असल्यास, अवि प्रत्यय विकल्पाने लागतो. उदा. सोस-सोसिअ, सोसविअ. ४) पुढे क्त किंवा कर्मणि प्रत्यय असल्यास, णि प्रत्ययाचा लोप अथवा आवि असे आदेश होतात.
३.१५६
क्त -- सू. ३.१५२ वरील टीप पहा. हा प्रत्यय प्राकृतात अ (य) असा होतो. तत्पूर्वी धातूच्या अन्त्य अ चा इ होतो. उदा. हस-हसिअ.
३.१५७ क्त्वा....प्रत्यये -- क्त्वा साठी सू. १.२७ वरील टीप पहा. तुम्
-- धातूपासून हेत्वर्थक अव्यय साधण्याचा प्रत्यय आहे. हा प्रत्यय प्राकृतात उं असा होतो. तव्य -- धातूपासून वि.क.धा.वि. साधण्याचा तव्य प्रत्यय आहे. हा प्रत्यय प्राकृतात अव्व (यव्व) असा होतो. भविष्यत्कालविहितप्रत्यय -- भविष्यकाळाचा म्हणून सांगितलेला प्रत्यय. या प्रत्ययासाठी सू. ३.१६६ इत्यादी पहा.
३.१५८ वर्तमाना -- वर्तमानकाळ. पञ्चमी -- आज्ञार्थ. शतृ -- धातूपासून
व.का.धा.वि. साधण्याचा प्रत्यय. या प्रत्ययासाठी सू. ३.१८१ पहा.
३.१५९ जाजे -- जा आणि ज. हे आदेश प्राकृतात बरेच व्यापक केलेले
आहेत (सू. ३.१७७ पहा).
३.१६० चिजि....वक्ष्याम: -- यासाठी सू. ४.२४१ पहा. क्यस्य स्थाने
-- क्य या प्रत्ययाच्या स्थानी. धातूपासून कर्मणि आणि भावे अंग साधण्याचा क्य प्रत्यय आहे. हसीअन्तो....हसिज्जमाणो -- येथे कर्मणि अंगांना सू. ३.१८१ नुसार अन्त व माण हे प्रत्यय लागलेले