________________
प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद
४९७
في في في
वर्तमानकाळ : अस धातु म्हि, अत्थि म्हो, म्ह, अत्थि सि, अत्थि अत्थि अत्थि
अत्थि
३.१४९-३.१५३ या सूत्रांत प्रयोजक धातू साधण्याची प्रक्रिया सांगितली आहे.
३.१४९ णे: स्थाने -- णि च्या स्थानी. प्रयोजक धातु साधण्यास धातूला
लावल्या जाणाऱ्या प्रत्ययाला ‘णि' अशी तांत्रिक संज्ञा आहे.
३.१५० गुर्वादेः -- ज्यातील आदि स्वर गुरू म्हणजे दीर्घ आहे, त्याचा.
३.१५१ भ्रमे: -- भ्रमि - भ्रम्. एकाद्या धातूचा निर्देश करताना, त्याला इ
(इक्) जोडला जातो. (इश्तिपौ धातुनिर्देशे। पा.अ.३.३.१०८). भामेइ...भमावेइ -- ही रूपे सू. ३.१४९ नुसार होतात.
३.१५२ णे: स्थाने....परत: -- क्त आणि कर्मणि प्रत्यय पुढे असताना, णि
प्रत्ययाचा लोप किंवा आवि असा आदेश होतो. उदा. कर+आवि+अ (क्त) = कराविअ. कर+आवि+ज (कर्मणि) = कराविज्ज. ‘णि' च्या अ आणि ए या आदेशांचा लोप होतो. तेव्हा :- कर+0+अ (क्त) = कार+0+अ = कारिअ. कर+0+ज (कर्मणि) = कार+0+ज्ज = कारिज. क्त -- धातूपासून क.भू.धा.वि. साधण्याच्या प्रत्ययाला क्त ही तांत्रिक संज्ञा आहे. उदा.- गम्-गत. भावकर्मविहितप्रत्यय - - धातूपासून कर्मणि आणि भावे अंग तयार करण्यासाठी सांगितलेला क्य हा प्रत्यय. कारीअइ.... हसाविजइ -- ही प्रयोजक धातूंची कर्मणि रूपे आहेत.
३.१५३ आदेरकारस्य -- धातूतील आदि अकाराचा.