________________
प्राकृत व्याकरणे-तृतीय पाद
४७९
या पदाची निवृत्ति करण्यासाठी प्रस्तुत सूत्रात ‘स्वरात्' शब्द वापरला आहे.
३.२६ उम्मीलन्ति....जेम वा -- मागील शब्दांची प्रथमा किंवा द्वितीया
दाखविण्यास येथील क्रियापदे आहेत.
३.२८ एसा हसन्तीआ -- हसन्तीआ हे प्र.ए.व. सूचित करण्यास एसा शब्द
वापरला आहे.
३.२९ मुद्धाअ....ठिअं -- कयं, मुहं व ठियं हे शब्द तृतीया, षष्ठी व सप्तमी
दाखविण्यास वापरले आहेत. मुद्धाआ असे रूप न होण्याचे कारण सू.३.३० मध्ये आहे. कप्रत्यये....कमलिआए -- स्वार्थे क प्रत्यय लावल्यावर, मुद्धाचे मुद्धिआ व कमला चे कमलिआ असे रूप होते. बुद्धीअ...ठिअं वा -- येथे कयं शब्द तृतीया दाखविण्यास, ठियं शब्द सप्तमी दाखविण्यास आणि विहवो, वयणं, दुद्धं, भवणं हे शब्द षष्ठी दाखविण्यास वापरले आहेत.
३.३० मालाअ....आगओ -- कयं, सुहं, ठिअं, आगओ हे शब्द मालाची
अनुक्रमे तृतीया, षष्ठी, सप्तमी व पंचमी दाखविण्यास आहेत.
३.३१ ङी: -- ई (ङी) हा प्रत्यय. आप -- आ (आप) हा प्रत्यय. हे प्रत्यय
लावून स्त्रीलिंगी रूपे साधली जातात. उदा. साहण (साधन)- साहणी, साहणा.
३.३३ किम्, यद्, तद् या सर्वनामांची स्त्रीलिंगी अंगे प्राय: का, जा, ता अशी
होतात. सि, अम्, आम् हे प्रत्यय सोडून, इतर प्रत्ययांपूर्वी त्यांची स्त्रीलिंगी अंगे विकल्पाने की, जी, ती अशी ईकारान्त होतात.