________________
४८०
टीपा
३.३५ डा -- डित् आ. ससा नणन्दा दुहिआ -- प्राकृतात ऋ-ऋ हे स्वर
नाहीत. त्यामुळे स्वसृ, ननन्दृ, दुहितृ या ऋकारान्त शब्दांना डा प्रत्यय जोडला जातो. गउआ -- गवय शब्दाला डा प्रत्यय लागला आहे.
३.३८ चप्फलया -- मिथ्याभाषी या अर्थी चप्फल/चप्फलय हा देशी शब्द
आहे.
३.३९ हे पिअरं -- सू.३.४० पहा.
३.४१ अम्मो -- अम्मा हा आई या अर्थी देशी शब्द आहे.
३.४३ क्विबन्तस्य -- क्विप् प्रत्ययाने अन्त पावणाऱ्याचा. क्विप् हा धातूंना
लागणारा एक कृत् प्रत्यय आहे. तो प्रथम लागतो व मग त्याचा लोप होतो.
३.४४ ऋकारान्त शब्दांची उकारान्त अंगे उकारान्त नामाप्रमाणे चालतात.
३.४५ ऋकारान्त शब्दांची आर ने अन्त पावणारी अंगे अकारान्त शब्दाप्रमाणे
चालतात. लुप्तस्याद्यपेक्षया-- विभक्तिप्रत्ययांपूर्वी शब्दाच्या अन्त्य ऋ चा आर होतो. आता, पुढे येणाऱ्या विभक्तिप्रत्ययांचा लोप झाला (लुप्तस्यादि) आणि हा शब्द समासात गेला, तरी लुप्त स्यादिच्या अपेक्षेने हा आर आदेश तसाच रहातो. उदा. भत्तार - विहिअं.
३.४६ बाहुलकात् -- बहुलत्वामुळे. मातुरिद्....वन्दे -- मातृ शब्दाची
इकारान्त व उकारान्त अंगे इकारान्त आणि उकारान्त स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणे चालतात.
३.४७ ऋकारान्त नामांच्या अंती अर आदेश आल्यावर ही नामे अकारान्त
शब्दाप्रमाणे चालतात.