SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 479
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७८ टीपा ३.१९ अक्लीबे -- नपुंसकलिंग नसताना. ३.२० इदुत....संबध्यते -- सू.३.१६ मध्ये इदुतः असे षष्ठ्यन्त पद आहे. ते प्रस्तुत ३.२० सूत्रात अनुवृत्तीने येतेच. फक्त ते येथे षष्ठ्यन्त न रहाता, आवश्यकतेनुसार पंचम्यन्त होते. म्हणून येथे इदुत: अशा पंचम्यन्त पदाचा संबंध प्रस्तुत सूत्रात आहे. पुंसि -- पुल्लिंगात. अउ....डितौ -- सूत्रातील डउ व डओ यांचा अर्थ आहे - डित् असणारे अउ, अओ हे आदेश. अग्गउ....चिट्ठन्ति -- मागील शब्दांचे प्र.अ.व. दाखविण्यास चिट्ठन्ति शब्द वापरला आहे. चिट्ठन्ति चा असा उपयोग पुढे सू.३.२८,५०,१२२ मध्ये, चिट्ठइ चा उपयोग सू.३.७९ मध्ये व चिट्ठह चा उपयोग सू.३.९१ मध्ये आहे. पक्षे....वाउणो -- सू.३.२२ पहा. शेषे....वाऊ -- सू.३.१२४ पहा. बुद्धीओ घेणूओ -- सू.३.२७ पहा. दहीइं महूई -- सू.३.२६ पहा. ३.२१ डित् अवो -- सूत्रातील डवो चा अनुवाद. साहुणो -- सू.३.२२ पहा. ३.२२ गिरिणो....रेहन्ति पेच्छ -- रेहन्ति व पेच्छ हे शब्द मागील शब्द हे प्रथमान्त तसेच द्वितीयान्त आहेत, हे दाखवितात. ३.२३ गिरिणो....आगओ विआरो -- मागील शब्दांची पंचमी वा षष्ठी दाखविण्यास आगओ व विआरो हे शब्द आहेत. हिलुको निषेत्स्येते - - इकारान्त व उकारान्त शब्दांच्या बाबतीत ङसिच्या लुक् आणि हि या आदेशांचा निषेध पुढे सू.३.१२६-१२७ मध्ये केला जाणार आहे. बुद्धिअ....समिद्धी -- मागील शब्दांची तृतीया व षष्ठी लद्ध व समिद्धी या शब्दांनी सूचित होते. ३.२५ स्वरादिति....निवृत्यर्थम् -- सू.३.१६ मधील इदुतः पदाची अनुवृत्ती चालू आहेच; पण ती प्रस्तुतच्या ३.२५ सूत्रात नको आहे. म्हणून इदुतः
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy