SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 477
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७६ टीपा ३.६ वच्छेण -- सू.३.६, १३. वच्छाण -- सू.३.६, १२ पहा. ३.७ सानुनासिक -- सू.१.१७८ वरील टीप पहा. वच्छेहि-हि-हिं -- सू.३.७, १५ पहा. छाही -- सू.१.२४९ पहा. ३.८ दो दु -- या स्वरूपात हे प्रत्यय शौरसेनी भाषेत वापरले जातात. म्हणून ‘दकारकरणं भाषान्तरार्थम्' असे पुढे सांगितले आहे. प्राकृतात मात्र हे प्रत्यय ओ आणि उ या स्वरूपात लागतात. वच्छत्तो -- सू.३.१२ नुसार होणाऱ्या दीर्घ स्वराचा ह्रस्व स्वर येथे सू.१.८४ नुसार होतो. वच्छाओ....वच्छा -- सू.३.१२ पहा. ३.९ भ्यस: -- प्राकृतात चतुर्थी विभक्ती नसल्याने, येथे भ्यस् शब्दाने पं.ब.व. चा भ्यस् प्रत्यय अभिप्रेत होतो. दो दु -- सू.३.८ वरील टीप पहा. वच्छाओ....वच्छेसुन्तो -- सू.३.१३, १५ पहा. ३.१० संयुक्तः स -- संयुक्त स म्हणजे स्स. ३.११ डित् एकारः -- सूत्रातील डे शब्दाचा अनुवाद. संयुक्तो मिः -- संयुक्त मि म्हणजे म्मि. देवं....ङिः -- येथे देवे - देवम्मि, ते - तम्मि अशी स.ए.व. ची रूपे न देता, देवं...तम्मि अशी दिली आहेत. त्यामध्ये देवं आणि तं ही द्वि.ए.व. ची रूपे आहेत. तेव्हा येथे सू.३.१३५ नुसार अम् च्या स्थानी ‘ङि' आहे, असे समजावयाचे आहे. ३.१२ कुसिनैव.... एत्वबाधनार्थम् -- प्रस्तुत सूत्रात ङसि म्हटले आहे. ङसि ने तो, दो, दु हे आदेश सू.३.८ नुसार संगृहीत होतातच. मग पुन: सूत्रात त्तो, दो, दु हे का सांगितले आहेत ? उत्तर - त्तो, दो, दु हे आदेश सू.३.९ नुसार भ्यस् प्रत्ययालाही होतात. भ्यस् प्रत्ययापूर्वी शब्दाच्या अन्त्य अ चा ए होतो (सू.३.१५); या ए चा बाध तो, दो, दु या
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy