SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 476
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तृतीय पाद वीप्सार्थात् पदात् -- हे शब्द सूत्रातील वीप्स्यात् शब्दाचा अनुवाद आहेत. ज्या पदाची पुनरावृत्ती केली जाते, त्याला वीप्स्य पद म्हणतात. स्यादेः स्थाने -- विभक्तिप्रत्ययाच्या स्थानी. स्यादि (सि+आदि) म्हणजे सि ज्यांच्या आदि आहेत ते, म्हणजे विभक्तिप्रत्यय. विभक्तिप्रत्ययांच्या तांत्रिक संज्ञा पुढीलप्रमाणे आहेत : विभक्ति एकवचन बहु (अनेक) वचन प्रथमा सि जस् द्वितीया अम् शस् तृतीया टा भिस् (चतुर्थी) (२) (भ्यस्) पंचमी ङसि भ्यस् षष्ठी ङस् आम् सप्तमी ङि सुप् डो -- डित् ओ. सू.१.३७ वरील टीप पहा. ३.२ ३.३ एतत्तदोकारात् -- एतद् आणि तद् यांच्या अकारापुढे. एय (अ) आणि 'त' या स्वरूपात ही सर्वनामे अकारान्त होतात. ३.४ वच्छा एए -- वच्छा हे प्र.अ.व. आहे हे दाखविण्यास एए हे एतद् सर्वनामाचे प्र.अ.व. वापरले आहे. सू.३.४,१२ नुसार, वच्छा हे रूप होते. वच्छे पेच्छ -- सू.३.४, १४ नुसार हे रूप बनते. वच्छे ही द्वितीया आहे हे दाखविण्यास पेच्छ या क्रियापदाचा वापर आहे. मागील शब्दाची / शब्दांची द्वितीया दाखविण्यास पेच्छ चा असा उपयोग पुढे सू. ३.५, १४, १६, १८, ३६, ५०, ५३, ५५, १०७-१०८, १२२, १२४ मध्ये केला आहे.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy