SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 474
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद ४७३ व.का.धा.वि.चे (सू.३.१८१) स्त्रीलिंगी रूप. विम्हरिमो -- या रूपासाठी सू.३.१४४ पहा. २.१९७ हुं -- (म) हूं. २.१९९ मुणिआ -- मुण (सू.४.७) च्या क.भू.धा.वि.चे स्त्रीलिंगी रूप. २.२०० ) -- (म) थू. २.२०१ रे हिअय मडहसरिआ -- रे हृदय! मृतकसदृश!; किंवा रे हृदय!. मडह (=अल्प) सरित्. पहिल्या रूपांतरासाठी ‘मडअसरिसा' असे शब्द आवश्यक होते. मडह हा अल्प या अर्थी देशी शब्द आहे. २.२०२ हरे -- अरे मध्ये ह् चा आदिवर्णागम होऊन, हा शब्द बनला, असे म्हणता येईल. २.२०३ ओ -- (म) ओ. तत्तिल्ल -- हा तत्पर या अर्थी देशी शब्द आहे. विकल्पे....सिद्धम् -- उत हे एक विकल्प दाखविणारे अव्यय आहे; सू.१.१७२ नुसार त्याचा ओ होतो. तेव्हा विकल्प दाखविणारे ओ हे अव्यय उत ला होणाऱ्या आदेशावरून सिद्ध झाले आहे. २.२०४ श्लोक १ :- धूर्त लोक तरुण स्त्रियांचे हृदय चोरतात (हरण करतात). तरी सुद्धा ते त्यांच्या द्वेषाला पात्र होत नाहीत, हे आश्चर्य आहे. इतर जनांपेक्षा अधिक असणारे हे धूर्त जन काहीतरी रहस्य जाणतात. श्लोक २ :- (छान!) ही सुप्रभात झाली. आज आमचे जीवित सफल झाले. तू गेल्यावर केवळ ती खिन्न होणार नाही. सप्फलं -- सू.२.७७ पहा. जीअं -- जीवित मध्ये सू.१.२७१ नुसार वि चा लोप झाला. जूरिहिइ -- सू.३.१६६ पहा. श्लोक ३ :- त्याचेच तेच गुण आता, अरेरे, धैर्य नष्ट करतात, रोमांच
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy