________________
प्राकृत व्याकरणे- द्वितीय पाद
२.१७२ भावे त्वतल् भाववाचक नामे साधण्यास त्व आणि तल् (ता)
असे प्रत्यय आहेत. मउअत्तयाइ प्रथम मृदुक शब्दाला त्त (त्व) प्रत्यय लागला (मउअत्त), मग पुन: ता (आ) प्रत्यय लागून मउअत्तया असा शब्द बनला. आतिशायिकात्त्वातिशायिकः अतिशयाचा अतिशय दाखविण्यात तमवाचक शब्दापुढे पुनः तर प्रत्यय ठेवतात. उदा.- ज्येष्ठ-तर.
२.१७३ विज्जुला
——
—
(म) बिजली. पीवल (म) पिवळा. अन्धल
(म) आंधळा. कथं जमलं.... भविष्यति जमल शब्दात स्वार्थे ल प्रत्यय आहे काय या प्रश्नाला येथे उत्तर आहे.
——
——
४७१
——
——
२.१७४ निपात्यन्ते निपात या स्वरूपात येतात. ( निपातन - व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न न करता अधिकृत ग्रंथात जसे शब्द आढळतात तसेच ते देणे). येथे दिलेल्या निपातातील अनेक शब्द देशी आहेत; पण त्यातील काहींचे मूळ संस्कृतपर्यंत नेता येते. उदा.- विउस्सग्ग व्युत्सर्ग मध्ये स्वरभक्ति होऊन. मुव्वहइ उद्वहति मध्ये म् हा वर्ण आदि आला. सक्खिण साक्षिन् च्या अन्ती अ स्वर मिसळला.
जम्मण
भिधेयः
जन्मन् मध्ये अन्ती अ मिसळला इत्यादी अत एव ..... - प्राकृतमध्ये वर्णान्तरित शब्द कोणते आणि कसे वापरावेत, त्याची कल्पना या वाक्यात दिलेली आहे.
——
-
——
२.१७५-२.२१८ या सूत्रांत अव्यये व त्यांचे उपयोग दिलेले आहेत.
२.१७५ हे अधिकारसूत्र आहे. सू. २.२१८ अखेर त्याचा अधिकार आहे.
२.१७९ श्लोक १ :- अग, अशक्त (दमलेल्या) अवयवांनी व्यभिचारी स्त्री वारंवार झोपते किंवा दमलेल्या अवयवांनी व्यभिचारिणी स्त्री वारंवार अति झोपते.