SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 471
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४७० टीपा (भव) या अर्थी. डितौ प्रत्ययौ -- डित् असणारे प्रत्यय. इल्ल आणि उल्ल हे डित् प्रत्यय आहेत. २.१६४-२.१७३ या सूत्रांत प्राकृतमधील स्वार्थे प्रत्यय सांगितलेले आहेत. २.१६४ स्वार्थे कः -- एकाद्या शब्दाचा मूळचा स्वत:चा अर्थ (स्व-अर्थ) न बदलता, तोच स्वार्थ सांगणारा क प्रत्यय आहे. प्राकृतात हा स्वार्थे क प्रत्यय नाम, विशेषण, अव्यय, तुमन्त इ. विविध शब्दांना लागतो. या क चे प्राकृतात य किंवा अ असे वर्णान्तर होते. कप् -- कुत्सा दाखविण्यास क (कप्) प्रत्यय लावला जातो. उदा. अश्व-क. (पाणिनी व्याकरणात हा प्रत्यय कन् असा आहे). यावादिलक्षण: क: -- यावादिभ्य: कन् (पा.अ.५.२.४९) हे सूत्र याव इत्यादी शब्दांसाठी क (कन्) प्रत्यय सांगते. उदा.- याव-क. २.१६५ संयुक्तो ल: -- संयुक्त ल म्हणजे ल्ल. सेवादित्वात् -- सेवादि शब्दांत अंतर्भाव होत असल्याने. सेवादि शब्दांसाठी सू.२.९९ पहा. २.१६६ अवरिल्लो -- सू.१.१०८ नुसार उपरि चे अवरि असे वर्णान्तर; त्याचेपुढे स्वार्थे ल्ल आला आहे. २.१६७ डमया -- डित् अमया. डित् साठी सू.१.३७ वरील टीप पहा. २.१६८ डिअम् -- डित् इअम्. २.१६९ डयम् डिअम् -- डित् अयम् आणि अम्. २.१७० डालिअ -- डित् आलिअ.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy