________________
प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद
४६९
२.१५७ अतोर्डावतो: -- सू.२.१५६ वरील टीप पहा. डित....एदह --
हे शब्द सूत्रातील डेत्तिअ, डेत्तिल आणि डेदह या शब्दांचा अनुवाद करतात. एत्तिअ, एत्तिल, एद्दह हे डित् आदेश आहेत.
२.१५८ कृत्वस् -- (अमुक) वेळा हा अर्थ दाखविण्यास, संख्यावाचकापुढे
कृत्वस् प्रत्यय येतो. कथं....भविष्यति -- कृत्वस् प्रत्ययाला हुत्त आदेश आहे. मग पियहुत्तं हे वर्णान्तर कसे, याचे उत्तर असे :-पियहत्तं मध्ये हुत्तं हा कृत्वस् चा आदेश नाही, तर अभिमुख या अर्थी जो हुत्त शब्द आहे. तो पिय शब्दापुढे येऊन पियहुत्तं हे वर्णान्तर होईल.
२.१५९ मतो: स्थाने -- मतु (मत्) प्रत्ययाच्या स्थानी. मत् (मतु, मतुप्) हा
स्वामित्वबोधक प्रत्यय आहे. उदा. श्रीमत्. आलु -- (म) आळु. उदा.- दयाळु, इ. लज्जालुआ -- लज्जालु पुढे स्त्रीलिंगी आ प्रत्यय आला आहे. सोहिल्लो छाइल्लो -- सू.१.१० नुसार शब्दातील अन्त्य स्वरांचा लोप झाला आहे. आल -- (म) आळ. उदा.केसाळ, रवाळ इ. वन्त मन्त -- हे दोन्ही प्रत्यय मराठीत आहेत. उदा.- धनवंत, श्रीमंत इ.
२.१६० तसः प्रत्ययस्य स्थाने -- तस् प्रत्ययाच्या स्थानी. पंचमी विभक्तीचा
अपादान हा अर्थ दाखविण्यास सर्वनामापुढे तस् प्रत्यय जोडला जातो.
२.१६१ त्रप्-प्रत्ययस्य -- स्थळ किंवा स्थान दाखविण्यास सर्वनामांना त्र
(त्रप्) प्रत्यय जोडला जातो. उदा.- यद्-यत्र.
२.१६२ दा-प्रत्ययस्य -- अनिश्चित काल दाखविण्यास एक या शब्दापुढे दा
प्रत्यय जोडला जातो. उदा.- एकदा.
२.१६३ भवेऽर्थे -- भव या अर्थी. अमुक ठिकाणी झालेला/जन्मलेला