________________
४६८
टीपा
(पा.अ.५.१.११६) हे सूत्र तसेच, तेन तुल्यं क्रिया चेद्वतिः (पा.अ.५.१.११५) हे सूत्र वत् प्रत्यय सांगतात.
२.१५१ सव्वगिओ -- येथे इक आदेशातील क् चा लोप झाला.
२.१५२ इकट् -- इकट् मध्ये ट् इत् आहे. सू.१.३७ वरील टीप पहा.
२.१५३ अप्पणयं -- आत्मन् चे अप्प (सू.२.५१) या वर्णान्तरापुढे णय
आदेश झाला.
२.१५४ त्वप्रत्ययस्य -- त्व या प्रत्ययाला. त्व हा भाववाचक नामे साधण्याचा
प्रत्यय आहे. उदा.- पीन - पीनत्व. डिमा -- डित् इमा. इम्न: ...नियतत्वात् -- सू.१.३५ वरील टीप पहा. पृथु इ.शब्दापासून भाववाचक नामे साधण्याचा इमन् असा प्रत्यय आहे. पीनता इत्यस्य....न क्रियते -- संस्कृतमध्ये भाववाचक नामे साधण्याचा ता (तल्) असा आणखी एक प्रत्यय आहे. हा प्रत्यय पीन शब्दाला लागून प्राकृतात पीणया असे रूप होते. त चा द होऊन बनणारे पीणदा हे वर्णान्तर दुसऱ्या म्हणजे शौरसेनी भाषेत होते, प्राकृतात नाही. म्हणून येथे तल् (ता) प्रत्ययाचा दा केलेला नाही. येथे हे लक्षात घ्यावे :- वररुचि (प्राकृतप्रकाश४.२२) तल् प्रत्ययाचा दा सागतो.
२.१५५ डेल -- डित् एल्ल. डित् साठी सू.१.३७ वरील टीप पहा.
२.१५६ डावादेरतो: परिमाणार्थस्य -- परिमाण या अर्थी असणाऱ्या डावादि
अतु प्रत्ययाला. क्तवतु, ड्वतुप, ड्मतुप्, मतुप् आणि वतुप् या सर्व प्रत्ययांना पाणिनीने अतु ही संज्ञा दिली आहे. यातील वत् (वतु, वतुप्) हा प्रत्यय परिमाण या अर्थी यद्, तद्, एतद्, किम् आणि इदम् या सर्वनामांना लागतो. उदा.- यावत्, तावत्, एतावत्, कियत्, इयत्.