________________
४६४
टीपा
२.९७ समासात दुसऱ्या पदाचे आदि व्यंजन हे विकल्पाने आदि किंवा अनादि
मानले जाते. त्यामुळे त्याचे विकल्पाने द्वित्व होते. उदा. ग्गाम, गाम.
२.९८ मूळ संस्कृत शब्दांत संयुक्त व्यंजन नसताना, ते शब्द प्राकृतात येताना,
त्यातील काही अनादि व्यंजनाचे द्वित्व होते. उदा. तैलादि शब्द.
२.९९ सू.२.९८ वरील टीप पहा. सेवादि शब्दांत हे द्वित्व विकल्पाने येते.
२.१००-२.११५ या सूत्रांत स्वरभक्ति (विश्लेष, विप्रकर्ष) चा विचार आहे.
स्वरभक्तीने अ, इ, उ किंवा ई हे स्वर येतात.
२.१०० सारङ्गं -- (म) सारंग / शारंग (-पाणि).
२.१०१ रयणं -- (हिं) रतन.
२.१०२ अग्गी -- (म) आग.
२.१०४ किया -- आर्ष प्राकृतात क्रिया शब्दामध्ये स्वरभक्ति न होता, किया
असे वर्णान्तर होते.
२.१०५ व्यवस्थितविभाषया -- सू.१.५ वरील टीप पहा.
२.१०६ अम्बिलं -- (म) आंबील.
२.११३ उकारान्ता ङीप्रत्ययान्ता: -- ई (ङी) या (स्त्रीलिंगी) प्रत्ययाने
अन्त पावणारे उकारान्त शब्द. उदा.- तनु+ई = तन्वी. स्रुघ्नम् -- हे एका प्राचीन गावाचे नाव आहे.