________________
प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद
४६३
२.८९ पदस्य अनादौ वर्तमानस्य -- पदाच्या अनादि स्थानी असणाऱ्याचे.
प्राकृतात पदाच्या आदि स्थानी संयुक्त व्यंजन असत नाही. शेष -- संयुक्त व्यंजनातील एकाद्या अवयवाचा लोप झाल्यावर, जे व्यंजन उरते, ते शेष व्यंजन होय. आदेश -- आदेश म्हणून येणारे व्यंजन येथे अभिप्रेत आहे. उदा.- कृत्ति मधील त्त या व्यंजनाला ‘च' आदेश होतो (सू.२.१२ पहा). नग्ग -- (म) नागडा; (हिं) नंगा. जक्ख -- (म) जाख.
२.९० द्वितीय ....इत्यर्थः -- वर्गीय व्यंजनांपैकी द्वितीय व चतुर्थ (तुर्य)
व्यंजनांचे द्वित्व करताना, त्यांच्या अगोदरची व्यंजने त्यांच्या पूर्वी येऊन म्हणजे द्वितीय व्यंजनापूर्वी पहिले व्यंजन व चतुर्थ व्यंजनापूर्वी तृतीय व्यंजन येऊन, त्यांचे द्वित्व होते. उदा.- क्ख, ट्ठ इ. वग्यो -- (म) वाघ. घस्य नास्ति -- 'घ' असा आदेश (कुठेच सांगितलेला) नाही; म्हणून आदेशरूप घ चे द्वित्व नाही.
२.९२ दीर्घा.....परयोः -- व्याकरणाच्या नियमाने आलेले व तसे न आलेले
(म्हणजे मूळातच असणारे) जे दीर्घ (स्वर) आणि अनुस्वार, त्यांच्यापुढे. कंसालो -- कंस+आल. आल हा मत्वर्थी प्रत्यय (सू.२.१५९) आहे.
२.९३ रेफ.....नास्ति -- सू.२.७९ नुसार रेफाचा सर्वत्र लोप होत असल्याने,
तो रेफ शेष व्यंजन म्हणून कधीच असत नाही. द्र या संयुक्त व्यंजनात मात्र (सू.२.८०) तो संयुक्त व्यंजनाचा द्वितीय अवयव म्हणून असू शकतो.
२.९४ आदेशस्य णस्य -- धृष्टद्युम्न शब्दात म्न चा ण आदेश आहे, असे
हेमचंद्र म्हणतो. म्न च्या ण साठी सू.२.४२ पहा.