________________
४६२
टीपा
(सू.२.७७ नुसार) झाल्यावर, सू.२.७५ नुसार ष्ण चा ग्रह झाला.
२.८३ ज्ञः सबन्धिनो..... लुग् -- ज्ञ शी (ज्ञ = ज्+ञ्+अ) संबंधित
असणाऱ्या ञ् चा लोप. सव्वण्णू -- यासारख्या शब्दातील ज्ञ च्या ण्ण साठी सू.१.१५६ पहा.
२.८४ मज्झण्हो -- ग्रह साठी सू.२.७५ पहा.
२.८५ पृथग्योगाद्..... निवृत्तम् -- सू.२.८० मध्ये विकल्पबोधक वा हा
शब्द आहे. त्याची अनुवृत्ती पुढील २.८१-८४ सूत्रांत आहे. आता, खरे म्हणजे या २.८५ मध्ये सांगितलेला दशार्ह शब्द सू.२.८४ मध्येच सांगता आला असता; पण तसे न करता, दशार्हसाठी सू.२.८५ हे स्वतंत्र सूत्र सांगितले. याचे कारण सू.२.८४ मध्ये येणारी वा शब्दाची अनुवृत्ती दशार्ह शब्दासाठी नको आहे. म्हणून सू.२.८५ मधील नियम वेगळा करून सांगितला असल्याने (पृथग्योगात्), सू.२.८५ मध्ये वा शब्दाची निवृत्ती होते.
२.८६ मासू -- मस्सू मधील संयुक्त व्यंजनात पहिल्या स् चा लोप होऊन,
मागील अ हा स्वर दीर्घ झाला.
२.८७ हरिअन्दो -- हरिश्चन्द्र शब्दात श्च् चा लोप झाल्यावर, फक्त अ हा
स्वर शिल्लक राहिला.
२.८८ राई -- या वर्णान्तराचे आणि एक स्पष्टीकरण असे :- रात्रि-रत्ति-राति
(सुलभीकरण) -- राइ (सू.१.१७७ नुसार त् चा लोप).
२.८९-२.९३ वर्णान्तर - संयुक्त व्यंजनांचे वर्णविकार करताना कोणते नियम
पाळावे, त्याची सूचना या सूत्रांत दिलेली आहे.