________________
प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद
४६१
२.७९ ऊर्ध्वमधश्च स्थितानाम् -- सू.२.७७-७८ वरील टीप पहा. वक्कलं
-- (म) वाकळ. सद्दो -- (म) साद. पकके पिक्कं -- (म) पक्का, पिका, पिकला. चक्कं -- (म) चाक. रत्ती -- (म) राती, रात. अत्र द्व.... लोप: -- द्व इत्यादीसारख्या काही संयुक्त व्यंजनात, भिन्न नियमानुसार, एकाच वेळी पहिल्या व दुसऱ्या अवयवाचा लोप प्राप्त होतो. उदा.- द्व या संयुक्त व्यंजनामध्ये, सू.२.७७ नुसार द् चा लोप प्राप्त होतो, आणि सू.२.७९ नुसार व् चाही लोप प्राप्त होतो. जेव्हा असे दोनही अवयवांचे लोप प्राप्त होतात (उभयप्राप्तौ), तेव्हा जसे वाङ्मयात आढळेल तसे, कोणत्या तरी एका अवयवाचा लोप करावा. उदा.- उद्विग्न मध्ये द्
चा लोप करून उव्विग्ग, तर काव्य मध्ये य् चा लोप करून कव्व अशी वर्णान्तरे होतील. मलं -- (म) माळ. दारं -- (म) दार.
२.८० द्रशब्दे....भवति -- प्राकृतात प्राय: संयुक्त व्यंजनातील रेफाचा लोप
होतो (सू.२.७९). पण द्र या संयुक्त व्यंजनात रेफाचा लोप विकल्पाने होतो. स्थितिपरिवृत्तौ -- स्थितिपरिवृत्ति झाली असताना. स्थितिपरिवृत्ति म्हणजे वर्ण-व्यत्यास, वर्णव्यत्यय, शब्दातील वर्णांच्या स्थानांची अदलाबदल. या स्थितिपरिवृत्तीसाठी सू. २.११६-१२४ पहा. वोद्रहीओ -- वोद्रही चे प्रथमा अ.व. वोद्रही (दे) -- तरुणी. वोद्रह (दे) - - तरुण (तारुण्य).
२.८१ ह्रस्वात्....धाई -- धात्री शब्दापासून धाई हे वर्णान्तर कसे होते, ते
येथे सांगितले आहे. रेफाचा लोप होण्यापूर्वी, (धत्री मधील ध या) ह्रस्वापासून (धा असा दीर्घ स्वर होऊन) धाई शब्द बनला. या संदर्भात सू.२.७१ पहा. येथे खरे म्हणजे २.८८ मधील राई प्रमाणे प्रकार घडतो, असे म्हणता येईल.
२.८२ तिक्खं -- (म) तिखट. तीक्ष्ण मधील ण चा लोप होऊन, सू.२.३
नुसार क्ष चा क्ख झाला. तिण्हं -- तीक्ष्ण मधील क् चा लोप