________________
४६०
टीपा
२.७२ दक्खिणो -- सू.२.३ पहा.
२.७४ मकाराक्रान्तो हकारः -- मकाराने युक्त ह म्हणजे म्ह. रस्सी --
(म) रस्सी (-खेच).
२.७५ णकाराक्रान्तो हकारः -- णकाराने युक्त ह म्हणजे ण्ह. विप्रकर्ष -
- संयुक्त व्यंजनात मध्ये स्वर घालून संयुक्त व्यंजन नाहीसे करण्याची पद्धत; स्वरभक्ति. सू.२.१००-११५ पहा. कसणो कसिणो -- यांतील स्वरभक्तीसाठी सू.२.१०४, ११० पहा.
२.७६ लकाराक्रान्तो हकारः -- लकाराने युक्त ह म्हणजे ल्ह.
२.७७-२.७९ संयुक्त व्यंजनातील कोणत्या अवयवाचा लोप होतो, ते या सूत्रांत
सांगितले आहे.
२.७७ ऊर्ध्वस्थितानाम् -- संयुक्त व्यंजनात आधी, अगोदर म्हणजे प्रथम
अवयव असणा-यांचा. दुद्धं -- (म) दूध. मोग्गरो -- (म) मोगर. णिच्चलो -- (म) निचळ. क, प -- क् आणि ख् या व्यंजनापूर्वी जो वर्ण अर्ध विसर्गासारखा उच्चारला जातो, त्याला जिह्वामूलीय म्हणतात व तो क, ख असा दाखविला जातो. तसेच, प्
आणि फ् या व्यंजनांपूर्वी जो वर्ण अर्ध विसर्गासारखा उच्चारला जातो, त्याला उपध्मानीय म्हणतात. व तो प, फ असा दाखविला जातो. खरे म्हणजे हे दोन्ही स्वतंत्र वर्ण नसून, विसर्गाच्या उच्चाराचे प्रकार आहेत. (मागधीमध्ये जिह्वामूलीय आहे. सू.४.२९६ पहा). क चे उदाहरण हेमचंद्राने दिलेले नाही. ते असे :- अन्त करण - अंतक्करण.
२.७८ अधो वर्तमानानाम् -- संयुक्त व्यंजनात नंतर, मग म्हणजे द्वितीय
अवयव म्हणून असणाऱ्यांचा. कुड्डं -- (म) कूड.