SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 460
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद ४५९ २.५९ उभं उद्धं -- पुढे संयुक्त व्यंजन असल्याने, सू.१.८४ नुसार दीर्घ ऊ चा ह्रस्व उ झाला. उब्भ -- (म) उभा. २.६० कम्हारा -- श्म च्या म्ह साठी सू. २.७४ पहा. २.६३ चौर्यसमत्वात् -- सू.२.२४ वरील टीप पहा. २.६४ धिजं -- धैर्य पासून धेज (सू.१.१४८, २.२४). आता धेज मधील ह्रस्व ए चे ऐवजी ह्रस्व इ येऊन धिज हे वर्णान्तर झाले. सूरो....भेदात् -- सूर्य शब्दापासूनच प्रस्तुत नियमाने सूर आणि सुज ही वर्णान्तरे होत नाहीत काय? या शंकेचे समाधान या वाक्यात आहे. २.६५ पर्यन्ते .... रो भवति -- पर्यन्त शब्दात, सू.१.५८ नुसार प मधील अ चा ए झाला असता, त्या एकारापुढील र्य चा र होतो. पजन्तो -- येथे सू.२.२४ नुसार र्य चा ज झाला. २.६६ आश्चर्ये .... रो भवति -- सू.२.६५ वरील टीप पहा. अच्छरिअं - - सू.२.६७ पहा. २.६७ येथे सांगितलेल्या र्य च्या आदेशांचे वेगळे स्पष्टीकरण असे देता येईल : रिअ, रीअ (स्वरभक्तीने); अर (स्वरभक्ति आणि वर्ण - व्यत्यय); रिज्ज (र्य चा ज व तत्पूर्वी रि चा आगम). २.६८ पलिअंको -- पल्यक शब्दात स्वरभक्ति झाली. २.६९ भयस्सई भयप्फई -- येथील भय आदेशासाठी सू २.१३७ पहा. २.७१ कहावण -- या वर्णान्तरासाठी कर्षापण असा संस्कृत शब्द हेमचंद्र सुचवितो.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy