________________
प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद
४६५
२.११६-२.१२४ या सूत्रांत वर्णव्यत्यय (स्थितिपरिवृत्ति, वर्णव्यत्यास) ही प्रक्रिया __सांगितली आहे. या प्रक्रियेत शब्दातील वर्णांच्या स्थानांची अदलाबदल
होते. उदा.- वाराणसी - वाणारसी.
२.११६ एसो करेणू -- करेणू चे पुल्लिंग दाखविण्यास एसो हे पुल्लिंगी सर्वनामाचे
रूप वापरले आहे. २.११८ अलचपुरं -- सध्याचे एलिचपुर.
२.१२० हरए -- ह्रद - हरद (स्वरभक्ति)- हरय (यश्रुति).
२.१२२ लघुक.....भवति -- लघुक या शब्दात, अगोदरच घ चा ह
(सू.१.१८७) केला असता, विकल्पाने वर्णव्यत्यय होतो. हलुअं - - (म) हळु.
२.१२३ स्थानी -- ज्याच्या ऐवजी आदेश सांगितला जातो, तो वर्ण किंवा
शब्द.
२.१२४ य्ह हे य् चे हकारयुक्त रूप आहे.
२.१२५-२.१४४ या सूत्रांत काही संस्कृत शब्दांना होणारे प्राकृतमधील आदेश
सांगितले आहेत. त्यातील काहींचे भाषाशास्त्रीय स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे. इतर आदेश मात्र नवीन किंवा देश्य शब्द आहेत. काही शब्दांचे भाषाशास्त्रीय स्पष्टीकरण पुढे दिले आहे.
२.१२५ थोक्क -- स्तोक - (सू.२.४५ नुसार) थोक - थोक्क (क चे द्वित्व).
थोव -- थोक मध्ये क चा व होऊन. थेव -- थोवमध्ये ओ चा ए होऊन.