________________
प्राकृत व्याकरणे
४५
स्वरस्य उद्वृत्ते स्वरे परे सन्धिर्न भवति । विससिज्जन्त' महापसुदंसणसंभमपरोप्परारूढा । गयणे च्चिअ गंधउडिं, कुणन्ति तुह कउलणारीओ । । १ । । निसाअरो' निसिअरो। रयणीअरो । मणुअत्तं । बहुलाधिकारात् क्वचिद् विकल्पः। कुम्भ - आरो५ कुम्भारो । सु - उरिसो ६ सूरिसो । क्वचित् सन्धिरेव। सालाहणो । चक्काओ' । अत एव प्रतिषेधात् समासेऽपि स्वरस्य सन्धौ भिन्नपदत्वम् ।
(अनु.) (शब्दातील) एकाद्या व्यंजनाचा लोप झाल्यावर, त्या व्यंजनाशी संपृक्त असणारा जो स्वर शिल्लक रहातो, त्याला येथे उद्वृत्त म्हटले आहे. (शब्दात एकाद्या) स्वरापुढे उद्वृत्त स्वर आला असताना, संधि होत नाही. उदा. विससिज्जन्त...मणुअत्तं. बहुलच्या अधिकारामुळे, क्वचित् विकल्प आढळतो (म्हणजे विकल्पाने संधि) होतो. उदा. कुंभआरो...सूरिसो. क्वचित् संधिच होतो. उदा. सालाहणो, चक्काओ. म्हणून (संधीचा) असा निषेध असल्याने, समासातही स्वरसंधीच्या बाबतीत भिन्न पदे मानली जातात.
( सूत्र ) त्यादे: ।। ९ ।
( वृत्ति) तिबादीनां स्वरस्य स्वरे परे सन्धिर्न भवति । भवति इह । होइ इह । (अनु.) धातूंना लागणारे प्रत्यय, इत्यादीमधील (अन्त्य) स्वराचा पुढे स्वर आला असताना, संधि होत नाही. उदा. भवति.... इह.
( सूत्र ) लुक् ।। १० ।।
( वृत्ति) स्वरस्य स्वरे परे बहुलं लुग् भवति । त्रिदशेश: तिअसीसो । निःश्वासोच्छ्वासौ नीसासूसासा ।
१ विशस्यमानमहापशुदर्शनसम्भ्रमपरस्परारूढाः।
गगन एव गन्धकु(पु)टीं कुर्वन्ति तव कौलनार्यः ।।
२ निशाच (क) र
३ रजनीच (क) र
५ कुम्भकार
६ सुपुरुष
४ मनुजत्व
७ शातवाहन ८ चक्रवाक