________________
४४
प्रथमः पादः
होत नाही. उदा. न वेरि....पडिभिन्नो. इ-वर्ण आणि उ-वर्ण यांचा (पुढील विजातीय स्वराशी संधि होत नाही), असे का म्हटले आहे ? (कारण पुढीलप्रमाणे त्यांचे संधि शक्य आहेत-) गूढोअर...पन्ति व्व. (सूत्रात) विजातीय स्वर (पुढे असताना), असे का म्हटले आहे ? (कारण इ व उ यांचा पुढील सजातीय स्वरांशी संधि होऊ शकतो. उदा.) पुहवीसो.
(सूत्र) एदोतो: स्वरे ।। ७।। (वृत्ति) एकार-ओकारयोः स्वरे परे सन्धिर्न भवति।
वहुआइ नहुल्लिहणे, आबन्धन्तीऍ कञ्चुअं अंगे। मयरद्धयसरधोरणिधाराछेअ व्व दीसन्ति।।१।। उवमासु अपज्जत्तेभकलभ-दन्तावहासमूरुजुआं। तं चेव मलिअबिसदंडविरसमालक्खिमो एण्हिं।।२।। अहो अच्छरिअं। एदोतोरिति किम्? अत्थालोअणतरला इअरकईणं भमन्ति बुद्धीओ।
अत्थ च्चेअ निरारम्भमेन्ति हिअयं कइन्दाणं।।३।। (अनु.) एकार आणि ओकार (=ए व ओ हे स्वर) यांच्यापुढे स्वर आला
असताना संधि होत नाही. उदा. वहुआइ....अच्छरिअं. ए आणि ओ या स्वरांचा, असे सूत्रात का म्हटले आहे ? (कारण ए व ओ खेरीज अ, इत्यादि स्वरांचा पुढील स्वराशी संधि होऊ शकतो. उदा. अत्थालोअण...कइन्दाणं.)
(सूत्र) स्वरस्योद्वृत्ते ।। ८॥ (वृत्ति) व्यञ्जनसंपृक्त : स्वरो व्यञ्जने लुप्ते योऽवशिष्यते स उद्वृत्त इहोच्यते।
१ २
वध्वा नखोल्लेखने आबध्नत्या कञ्चकमङ्गे। मकरध्वजशरधोरणिधाराछेदा इव दृश्यन्ते।। उपमासु अपर्याप्तेभकलभदन्तावभासमूरुयुगम्। तदेव मृदितबिसदण्डविरसमालक्षयामह इदानीम्। अहो आश्चर्यम्। ४ अर्थालोचनतरला इतरकवीनां भ्रमन्ति बुद्धयः।
३