________________
४५६
टीपा
चर्चा आहे. पण सुलभीकरणाची स्वतंत्र चर्चा मात्र नाही. (सुलभीकरणाची संकीर्ण उदाहरणे मात्र सू. २.२१, २२, ५७, ७२, ८८, ९२ याखाली आढळतात).
संयुक्त व्यंजनांचे विकार सांगताना, हेमचंद्राने त्यांची मांडणी क, ख इ. वर्णानुक्रमाने केली आहे. २.१ हे अधिकारसूत्र आहे. याचा अधिकारसू. २.११५ पर्यंत म्हणजे सू.२.११४
अखेर आहे. संयुक्तस्य -- संयुक्त व्यंजनाचा.
२.२
संयुक्तस्य को भवति -- संयुक्त व्यंजनाचा क होतो. म्हणजे संयुक्त व्यंजनातील एका अवयवाचा लोप होऊन क हे व्यंजन रहाते (किंवा येते). हे के व्यंजन अनादि असल्यास, सू.२.८९ नुसार त्याचे द्वित्व होते. उदा.- शक्त - सक् - सक्क. पुढे येणाऱ्या सूत्रांमध्ये असाच प्रकार जाणावा.
२.३
खो भवति -- ख होतो. सू.२.२ वरील टीप पहा. ख अनादि असल्यास, त्याचे द्वित्व सू.२.९० नुसार होईल. आता, हे उरलेले ख व्यंजन जर प्राकृतात शब्दाच्या आरंभी येत असेल, तर त्याचे द्वित्व न होता, ते तसेच रहाते. उदा.- क्षय - खअ. पुढे येणाऱ्या उदाहरणांतही असेच जाणावे.
२.४ नाम्नि संज्ञायाम् -- नामवाचक शब्दात. पोक्खरिणी -- (म)
पोखरण.
२.८
खम्भो
-- (म) खांब.
२.१५ भुक्त्वा , ज्ञात्वा, श्रुत्वा, बुद्ध्वा -- ही संस्कृतमध्ये भुज्, ज्ञा, श्रु
आणि बुध् धातूंची पू.का.धा.अ.आहेत. त्यामध्ये त्व आणि ध्व ही संयुक्त व्यंजने आहेत. श्लोक १ -- सकल पृथ्वीचा भोग घेऊन, इतरांना शक्य नाही असे तप आचरून, विद्वान शांति (-नाथ जिन) (तत्त्व) जाणून श्रेष्ठ अशा मोक्षपदी (सिवं) पोचले.