________________
द्वितीय पाद
या पादात १-९७ व १००-११५ या सूत्रांत, संस्कृतमधील संयुक्त व्यंजने प्राकृतमध्ये येताना, त्यांत कोणते विकार होतात, ते सांगितले आहे. संयुक्त व्यंजनांच्या बाबतीत स्वरभक्ति, समानीकरण किंवा सुलभीकरण या प्रक्रिया वापरल्या जातात. जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजने मध्ये, स्वर न येता एकत्र येतात, तेव्हा संयुक्त व्यंजन होते. उदा. क्य, र्त, स्न, त्य॑ इ. या व्यंजनांच्या मध्ये अधिक स्वर घालून, संयुक्त व्यंजन नाहीसे करण्याच्या पद्धतीला ‘स्वरभक्ति' म्हणतात. उदा. रत्न-रतन. सू.२.१००-११५ मध्ये स्वरभक्तीची चर्चा आहे. सर्वच संयुक्त व्यंजनांच्या बाबतीत स्वरभक्ति वापरली जात नाही. इतरांच्या बाबतीत इतर काही पद्धती वापरल्या जातात. कारण संस्कृतमधील सर्व प्रकारची संयुक्त व्यंजने प्राकृतात चालत नाहीत. म्हणजे असे:- १) प्राकृतात फक्त दोन अवयवांची संयुक्त व्यंजने चालतात. उदा. कज्ज. ४) प्राकृतमध्ये शब्दाच्या अनादि स्थानीच संयुक्त व्यंजन चालते. ३) प्राकृतमधील संयुक्त व्यंजने काही विशिष्ट पद्धतीनेच बनलेली असतात :- (अ) द्वित्व होऊन :- (१) क्क, ग्ग, च्च, ज्ज, ट्ट, त्त, ६, प्प, ब्ब (वर्गीय १ ली व ३ री व्यंजने); ण्ण, न, म्म (वर्गातील अनुनासिके); ल्ल, व्व (अन्त); स्स (ऊष्म). (२) वर्गातील दुस-या व चौथ्या व्यंजनांचे पूर्वी वर्गातील पहिली व तिसरी व्यंजने येऊन, त्यांचे द्वित्व होते. उदा. क्ख, ग्घ, च्छ, ज्झ, टु, ड्ड, त्थ, द्ध, प्फ, ब्भ. (अ) वर्गातील अनुनासिक प्रथम अवयव व दुसरा अवयव त्याच वर्गातील व्यंजन :
ङ्क, ख, ग, घ ; ञ्च, ञ्छ, ञ, झ; ण्ट, ण्ठ, ण्ड, ण्ढ ; न्त, न्थ, न्द, न्ध; म्प, म्फ, म्ब, म्भ. (म्ह, ण्ह, म्ह, ल्ह ही संयुक्त व्यंजने नसून, त्या त्या वर्णांची हकारयुक्त रूपे आहेत). (शौरसेनी इ.भाषांत चालणाऱ्या संयुक्त व्यंजनासाठी सू. ४.२६६, २८९, २९२-२९३, २९५, २९८, ३०३, ३१५, ३९१, ३९३, ३९८, ४१४ पहा). संस्कृतमधील संयुक्त व्यंजने प्राकृतात चालती करून घेण्यास, समानीकरण ही मुख्य पद्धत आहे. समानीकरणाने संयुक्त व्यंजनातील एका अवयवाचा लोप होऊन, उरलेल्या व्यंजनाचे द्वित्व होते. समानीकरणाने आलेल्या द्वित्वातील एका अवयवाचा लोप केला व मागे ह्रस्व असणारा स्वर दीर्घ केला की सुलभीकरण होते. उदा. व्याघ्र - वग्घ - वाघ. सू.२.२-८८ मध्ये मुख्यतः समानीकरणाची