________________
प्राकृत व्याकरणे-द्वितीय पाद
४५७
२.१६ विञ्चओ -- (म) विंचू.
२.१७ खीरं -- (म) खीर.
२.१८ लाक्षणिकस्यापि..... भवति -- प्राकृत व्याकरणानुसार क्ष्मा शब्दाला
क्षमा असा आदेश होतो (सू.२.१०१ पहा). त्यातील ख चा छ होतो.
२.२० छण -- (म) सण.
२.२४ य्य -- य च्या द्वित्वाने बनणारे य्य हे संयुक्त व्यंजन माहाराष्ट्री प्राकृतात
नाही; त्याचे ज्ज असे वर्णान्तर होते. चौर्यसमत्वाद् भारिआ -- भार्या हा शब्द चौर्य शब्दाप्रमाणे असल्याने, त्यात स्वरभक्ति होऊन, भारिआ असे वर्णान्तर होते. चौर्यसम शब्दात स्वरभक्ति होते (सू.२.१०७ पहा). कजं -- (म) काम.
२.२६ मज्झं -- (म) माज (घर). गुज्झं -- (म) गूज.
२.२९ मट्टिआ -- (हिं) मिट्टी. पट्टण -- (म) पाटण.
२.३० वट्टल -- (म) वाटोळा. रायवट्टयं -- राजवार्तिक. उमास्वातीच्या
तत्त्वार्थाधिगम सूत्रावरील वार्तिक ग्रंथाचे राजवार्तिक नाव आहे. वर्त्मन् शब्दाचे वर्णान्तरही वट्ट होते; त्यामुळे येथे राजवर्मन् असाही संस्कृत प्रतिशब्द होईल. कत्तरी -- (म) कातरी.
२.३३ चउत्थो -- (म) चौथा.
२.३४ लट्ठी मुट्ठी -- (म) लाठी, मूठ. पुट्ठो -- (पुट्ठ) (म)
(घोड्याचा) पुठ्ठा.