SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 453
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४५२ टीपा १.२४० अनादि, असंयुक्त भ चा ह होतो या नियमाचा (सू.१.१८७) प्रस्तुत नियम अपवाद म्हणता येईल. १.२४२ येथे आदि असंयुक्त म् चा विकार सांगितला आहे. १.२४४ भसलो -- येथील र च्या ल साठी सू.१.२५४ पहा. १.२४५ आदि असंयुक्त य चा ज होणे हे एक महत्त्वाचे वर्णान्तर आहे. जम - - (हिं) जम. १.२४६ युष्मच्छब्देऽर्थपरे -- तू-तुम्ही असा द्वितीय पुरुषी अर्थ असणाऱ्या युष्मद् या शब्दात. जुम्हदम्हपयरणं -- युष्मद् व अस्मद् यां (सर्वनामां) चा विचार करणारे प्रकरण. १.२४७ लट्ठी -- (म) लाठी. १.२४८ अनीयतीयकृद्यप्रत्ययेषु - अनीय हा एक कृत् प्रत्यय आहे. तो धातूला जोडून वि.क.धा.वि. सिद्ध केले जाते. उदा.- कृ-करणीय. तीय -- द्वि आणि त्रि या संख्यावाचकांना पूरणार्थी लागणारा तीय हा प्रत्यय आहे. उदा.- द्वितीय, तृतीय. कृद्य -- कृत् य म्हणजे य हा कृत् प्रत्यय आहे. हा प्रत्यय धातूला लावून वि.क.धा.वि. सिद्ध केले जाते. उदा.- मा - मेय. इतर 'य' प्रत्ययापासूनचे भिन्नत्व दाखविण्यास येथे कृद् य म्हटले आहे. बिइज्ज -- (म) बीज. १.२५० डाह -- डित् आह. डित् साठी सू.१.३७ वरील टीप पहा. १.२५४ अनादि, असंयुक्त र चा ल हे एक महत्त्वाचे वर्णान्तर आहे. चरणशब्दस्य
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy