________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४५१
१.२२८ स्वरापुढील अनादि, असंयुक्त न चा ण होणे, हे एक महत्त्वाचे वर्णान्तर
आहे.
१.२२९ वररुचीच्या मते, न् कुठेही असो, सर्वत्र त्याचा ण् होतो (नो णः सर्वत्र
प्राकृतप्रकाश-२.४२).
१.२३० लिम्बो -- (म) लिंब. पहाविओ -- (म) न्हावी.
१.२३१ सू.१.१७७ नुसार अनादि, असंयुक्त प् चा लोप होतो. सू.१.१७९
नुसार अ आणि आ या स्वरांपुढे येणाऱ्या प् चा लोप होत नाही. त्या प् चा व् होतो, असे या सूत्रात सांगितले आहे. अनादि, असंयुक्त प् चा व् हे एक महत्त्वाचे वर्णान्तर आहे. महिवालो -- (हिं) महिवाल. एतेन पकारस्य....तत्र कार्य:- प च्या बाबतीत लोप आणि वकार प्राप्त झाले असता, जो वर्णविकार कानाला गोड लागेल, तो करावा.
१.२३२-२३३ या दोन सूत्रांतही आदि प् चे विकार सांगितलेले आहेत.
१.२३२ ण्यन्ते पटि धातौ -- सू.१.१९८ वरील टीप पहा. फलिहो फलिहा
फालिहद्दो -- येथील र च्या ल साठी सू.१.२५४ पहा. फणसो - - (म) फणस.
१.२३५ पारद्धी -- (म) पारध.
१.२३६ अनादि, असंयुक्त फ आणि भ यांचा ह, हे एक महत्त्वाचे वर्णान्तर आहे.
१.२३७ अलाऊ -- येथे अनादि ब् चा लोप झाला आहे.
१.२३८ बिसतन्तु° -- येथे बिस शब्द नपुं. असल्याने, ब चा भ होत नाही.