________________
४५०
टीपा
१.२१५ मेढी -- (म) मेढा.
१.२१७-१.२२५ सू.१.१७७ नुसार जेव्हा द् चा लोप होत नाही, तेव्हा होणारे
द् चे विकार या सूत्रांत सांगितले आहेत, असे डॉ. वैद्य म्हणतात. पण ते म्हणणे संपूर्ण बरोबर नाही. कारण सू.१.१७७ अनादि द् चा विकार सांगते. तर सू.१.२१७ मध्ये अनादि तसेच आदि द् चा विकार सांगितला आहे; सू.१.२१८ मध्ये तसेच सू.१.२२३ मध्येही आदि द् चे विकारच सांगितले आहेत.
१.२१७ डोला -- (म) डोला, डोलारा. डण्ड -- (हिं) डंडा. डर --
(हिं) डर. डोहल -- (म) डोहाळा. डोहल मधील द च्या ल साठी सू.१.२२१ पहा.
१.२१८
डसइ -- (म) डसणे.
१.२१९ संख्यावाचक शब्दांत, मराठीमध्ये द चा र होतो. उदा. एकादश
अकरा, द्वादश-बारा, त्रयोदश-तेरा.
१.२२० कदलीशब्दे अद्रमवाचिनि -- वृक्षवाचक कदली शब्द नसताना,
म्हणजे कदली शब्दाचा अर्थ हस्ति-पताका (हत्तीच्या गंडस्थळावरील पताका) असा अर्थ असताना.
१.२२१ पलित्त -- (म) पलिता, ज्वलित (प्रदीप्त)
१.२२२ कलम्ब -- (म) कळंब.
१.२२४ कवट्टिओ -- येथील ट्ट साठी सू.२.२९ पहा.