________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४४९
(प्राकृत-प्रकाश २.७) या वररुचीच्या सूत्रात, स्वरापुढील अनादि असंयुक्त त चा द प्राकृतात होतो, असे सांगितले आहे. हेमचंद्राच्या मते, असा त चा द होणे हे प्राकृतचे वैशिष्ट्य नसून, ते शौरसेनी व मागधी या भाषांचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हेमचंद्र येथे म्हणतो की प्रस्तुत स्थळी प्राकृतच्या विवेचनात, त चा द हा वर्णविकार सांगितलेला नाही. न पुन:....इत्यादी -- (माहाराष्ट्री) प्राकृतात अनादि असंयुक्त त चा द होत नसल्याने, ऋतु, रजत इ. शब्दांची रिउ, रयय इ. रूपे होतात, परंतु उदू, रयदं इ. वर्णान्तरे मात्र होत नाहीत. क्वचित्...सिद्धम् -- समजा माहाराष्ट्रीत क्वचित्, काही शब्दात त चा द झालेला दिसत असेल (भावेऽपि), तर तो 'व्यत्ययश्च' (४.४४७) सूत्राने सिद्ध होईल. दिही.....वक्ष्याम: -- धृति शब्दापासून त चा द आणि मग वर्णविपर्यय होऊन दिही हे वर्णान्तर होते काय ? या प्रश्नाचे उत्तर येथे आहे. धृति शब्दाला दिही असा आदेश होतो, असे आम्ही पुढे (सू.२.१३१) सांगणार आहोत, असे हेमचंद्र म्हणतो. डॉ. वैद्य धृतिचे पुढीलप्रमाणे वर्णान्तर सुचवितात :- धृति - द्++ऋ+ति = द्+हि (ऋ चा इ होऊन) +इ (त् चा लोप होऊन) = द्+इ+हि (वर्णव्यत्यय होऊन) = दिहि.
१.२१०
सत्तरी -- (म) सत्तरी, सत्तर.
१.२११ अलसी -- (म) अळशी. सालाहणो -- सू.१.८ पहा.
१.२१३ स्वार्थलकारे परे -- स्वार्थे येणारा लकार पुढे असताना. या स्वार्थे
लकारासाठी सू.२.१७३ पहा. पीवलं -- (म) पिवळा. पीअलं -
- (हिं) पीला. १.२१४ काहलो -- र च्या ल साठी सू. १.२५४ पहा. माहुलिंगं -- (म)
महाळुग.