________________
४४६
टीपा
१.१७९
या सूत्राप्रमाणे प् चा लोप न झाल्यास, सू.१.२३१ नुसार प् चा व् होतो.
१.१८०. कगचजे....र्भवति -- सू.१.१७७ नुसार, क्,ग् इत्यादी व्यंजनांचा
लोप झाल्यावर, उरलेले स्वर अ आणि आ (अवर्ण) असून, जर त्यांच्या मागे अ आणि आ हे स्वर असतील (अवर्णात् परः), तर त्या उध्दृत्त अ आणि आ यांचा होणारा उच्चार हा अगदी लघु प्रयत्नाने उच्चारलेल्या य् व्यंजनाप्रमाणे ऐकू येतो; या प्रकाराला य-श्रुति म्हणतात. म्हणूनच या अ आणि आ यांच्या स्थानी कधी-कधी 'य' आणि 'या' लिहिले जातात. अवर्णा.....पिअइ -- अ आणि आ हे स्वर मागे असताना, उध्दृत्त अ आणि आ यांची यश्रुति होते, याला अपवाद आहे, हे हेमचंद्राला मान्य दिसते; म्हणून त्याने पियइ हे उदाहरण दिले आहे.
१.१८१ खुजो खप्परं खीलओ -- (म) खुजा; खापर; खीळ, खिळा.
खासिअं -- (हिं) खांसी. १.१८२ गेंदुअं -- (हिं) गेंद.
१.१८३ चिलाओ -- र् च्या ल् साठी सू. १.२५४ पहा.
१.१८६ फलिहो -- ट् च्या ल् साठी सू.१.१९७ पहा.
१.१८७ स्वरापुढील अनादि असंयुक्त ख्,घ्,थ्,ध्,भ् यांचा प्राय: ह् होतो, हा
वर्णविकाराचा एक महत्त्वाचा नियम आहे. मुहं -- (हिं) मुह. मिहणं -- (म) मेहुण. बहिरो -- (म) बहिरा.
१.१८८ डॉ. वैद्यांच्या मते, हे सूत्र १.२०८ नंतर यावयास हवे होते. (म्हणजे
१.२०४-२०८ मध्ये असणाऱ्या त च्या विकारानंतर प्रस्तुतचा थ् चा