________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४४७
विकार आला असता). पण हेमचंद्राने असे केलेले दिसते:- सू.१.१८७ मध्ये थ चा एक विकार सांगितला; त्यापेक्षा वेगळा असा थ चा विकार लगेच प्रस्तुतच्या सूत्रात सांगितला. असाच प्रकार हेमचंद्राने ख् च्या बाबतीत सू.१.१८९ मध्ये केला आहे.
१.१८९ संकलं -- शृङ्खलमध्ये ख हे संयुक्त व्यंजन असल्याने, सू.१.१८७
नुसार येथे ख् चा ह् होत नाही.
१.१९० पुन्नामाइँ -- या रूपासाठी सू.३.२६ पहा.
१.१९१ छालो हे पुल्लिंगी रूप व छाली हे स्त्रीलिंगी रूप आहे.
१.१९२ दूहवो -- दुर्भग शब्दात, सू.१.११५ नुसार रेफाचा लोप होऊन,
मागील ह्रस्व उ चा दीर्घ होतो (दूभग). आता, प्रस्तुत सूत्राने ग चा व होऊन, दूहव हे वर्णान्तर होते. दूहवच्या साम्याभासाने, सुभग शब्दाच्या बाबतीतही असाच प्रकार होऊन, सूहव वर्णान्तर होते असे दिसते.
१.१९३ पिसल्लो -- (म) पिसाळ.
१.१९५ स्वरापुढील अनादि, असंयुक्त ट चा ड होतो, हे एक महत्त्वाचे वर्णान्तर
आहे. घडो घडइ -- (म) घडा घडणे, घडविणे.
१.१९८ ण्यन्ते च पटि धातौ -- हे शब्द सूत्रातील पाटौ शब्दाचा अनुवाद
करतात. पट् धातूच्या प्रयोजक रूपामध्ये, असा त्यांचा अर्थ आहे. ण्यन्त -- संस्कृतात णि (णिच्) प्रत्यय धातूला जोडून, प्रयोजक (प्रेरक) धातूची रूपे साधली जातात. म्हणून ण्यन्त म्हणजे प्रयोजक प्रत्ययान्त (धातू). फालेइ फाडेइ-- हेमचंद्राच्या मते, ही पाटयति शब्दाची वर्णान्तरे आहेत. पण डॉ. वैद्यांच्या मते, स्फल् आणि स्फट