________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४४३
१.१५० सिन्नं -- सू.१.१४९ वरील टीप पहा.
१.१५३ देव्वं दइव्वं -- यातील द्वित्वासाठी सू.२.९९ पहा.
१.१५४ उच्च....सिद्धम् -- उच्चैः आणि नीचैः यांची वर्णान्तरे उच्चअं व
नीचअं अशी होतात. मग उच्च व नीच शब्दांची वर्णान्तरे कोणती होतात? उच्च शब्दाचे उच्च आणि नीच शब्दाचे नीच/नीय अशी वर्णान्तरे होतात.
१.१५६-१५८ प्राकृतात ओ हा स्वर आहे. तरी संस्कृत शब्दातील ओ मध्ये,
प्राकृतमध्ये येताना, कधी विकार होतात ? ते या सूत्रांत सांगितले आहेत.
१.१५६
अन्नुन्नं, पउठटो, आउज्जं -- या शब्दांतील ओ सू.१.८४ नुसार ह्रस्व होतो; त्यामुळे ह्रस्व ओ ऐवजी ह्रस्व उ आला. पवठटो, आवजं -- येथे क आणि त यांचा व झाला आहे.
१.१५९-१६४ औ हा स्वर प्राकृतात नाही. औ ची कोणती वर्णान्तरे होतात, ते
या सूत्रांमध्ये सांगितले आहे.
१.१५९ जोव्वणं -- द्वित्वासाठी सू. २.९८ पहा.
१.१६० सुंदेरं -- सू.२.६३ पहा. सुंदरिअं -- सू.२.१०७ पहा.
सुन्देरं....सुद्धोअणी -- या शब्दांत औ चा ओ झाला (सू.१.१५९); पुढे संयुक्त व्यंजन असल्याने हा ओ ह्रस्व होतो; या ह्रस्व ओ चे स्थानी ह्रस्व उ आला असे म्हणता येते.
१.१६१ कुच्छेअयं -- सू.१.१६० मध्ये सुंदेरं सुद्धोअणी वरील टीप पहा.