SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 443
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४४२ टीपा पहिले पद गौण असते. माउसिआ पिउसिआ -- येथील सिआ साठी सू. २.१४२ पहा. १.१३५ मातृशब्दस्य गौणस्य -- सू.१.१३४ वरील टीप पहा. माईणं -- माइ (मातृ) शब्दाचे षष्ठी अ.व. १.१४१ रिज्जू उज्जू -- (म) सरळ द्वित्वासाठी सू.२.९८ पहा. १.१४२ क्विप् टक् सक् -- हे कृत् प्रत्यय आहेत. सर्वनामानंतर किंवा ‘स' नंतर येणाऱ्या दृश् धातूला हे प्रत्यय लावून, दृश्, दृश व दृक्ष या शब्दांनी अन्त पावणारे शब्द सिद्ध होतात. उदा. ईदृश्, ईदृश, ईदृक्ष; सदृश्, सदृश, सदृक्ष. टक्....गृह्यते -- या सूत्रात कोणता क्विप् प्रत्यय अभिप्रेत आहे, ते येथे सांगितले आहे. १.१४६-१.१४७ प्राकृतात ए स्वर आहे. ए असणारे संस्कृत शब्द प्राकृतात येताना, कधी या ए मध्ये विकार होतात. ते या सूत्रांत सांगितले आहेत. १.१४६ वेदनादिषु -- वेदनादि शब्द याच सूत्रात दिलेले आहेत. महमहिअ -- हे महमह धातूचे क.भू.धा.वि. आहे. महमह हा प्र+सृ धातूचा आदेश आहे (सू.४.७८). १.१४८-१.१५५ प्राकृतात प्रायः ऐ हा स्वर नाही. या ऐ ला प्राकृतात कोणते विकार होतात, ते या सूत्रांत सांगितले आहे. १.१४९ सिन्धवं सणिच्छरो -- सैन्धव व शनैश्वर शब्दांत प्रथम ऐ चा ए झाला (सू.१.१४८); सू.१.८४ नुसार हा ए ह्रस्व होतो; या ह्रस्व ए ऐवजी ह्रस्व इ आली असे म्हणता येते.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy