________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४४१
१.११६ सदृश नियम सू.१.८५ मध्ये पहा.
१.१२१ भुमया -- सू.२.१६७ पहा.
१. १२४ कोहण्डी, कोहली -- या वर्णान्तरासाठी सू.२.७३ पहा. कोहली,
कोप्परं, थोरं, मोल्लं -- (म) कोहळा, कोपर, थोर, मोल.
१.१२६-१४५ प्राकृतमध्ये ऋ, ऋ, लु हे स्वर नाहीत. प्राकृतमध्ये त्यांना कोणते
विकार होतात, ते या सूत्रांत सांगितलेले आहे.
१.१२६ तणं -- (म) तण. कृपादिपाठात् -- कृपादि शब्दांच्या गणात
समावेश होत असल्याने. कृपादिगणातील शब्द सू.१.१२८ वरील वृत्तीत दिलेले आहेत. पण तेथे द्विधाकृतम् हा शब्द मात्र दिलेला नाही.
१.१२८ दिट्ठी -- (म) नजर. विञ्चुओ -- (म) विंचू.
१.१२९ पृष्ठशब्देऽनुत्तरपदे -- पृष्ठ हा शब्द समासात उत्तरपद नसताना (म्हणजे
तो समासात प्रथमपद असताना).
१.१३० सिंग -- (म) शिंग. धिट्ठ -- (म) धीट.
१.१३१ पाउसो -- (म) पाऊस.
१.१३३ ऋतो वेन सह -- (वृषभ शब्दात) व् सह ऋ चा. वसहो --
सू.१.१२६ पहा.
१.१३४ गौणशद्वस्य -- (समासातील) गौण शब्दांचे. तत्पुरुष समासात