________________
४३८
टीपा
१.६७ तलवेण्टं ....तालवोण्टं -- सू.१.१३९, २.३१ पहा. बाम्हणो,
पुव्वाण्हो -- येथे म्ह या संयुक्त व्यंजनाच्या मागे आ हा दीर्घ स्वर ह्रस्व न होता, तसाच राहिलेला दिसतो. त्याचे कारण प्राकृतात व्यवहारात म्ह हे संयुक्त व्यंजन नसून, (ख, भ इत्यादीप्रमाणे) ते म् चे हकारयुक्त रूप आहे. दवग्गी....सिद्धम् -- दवग्गी व चडू या शब्दांत प्रस्तुत सूत्राने आ चा अ झालेला आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. कारण ‘दवाग्नि' व 'चटु' या दोन शब्दांपासूनच ते सिद्ध झालेले आहेत.
१.६८ घञ्....आकारः -- घञ् प्रत्ययाच्या निमित्ताने (मूळ शब्दात) वृद्धि
होऊन आलेला आकार. घञ् हा संस्कृतमध्ये एक कृत् प्रत्यय आहे; तो लागताना, धातूतील स्वरात वृद्धि होते. अ, इ-ई, उ-ऊ, ऋ-ऋ, यांचे अनुक्रमे आ, ऐ, औ, आर्, आल् होणे म्हणजे वृद्धि होणे होय.
१.०६ मरहट्ठ -- यातील वर्ण व्यत्ययासाठी सू.२.११९ पहा. ७४ संखायं....सिद्धम् -- स्त्यै धातूपासून झालेल्या स्त्यान शब्दात आ चा
ई होतो. तरी सं+स्त्यै पासून साधलेल्या संखाय मध्ये आ चा ई झालेला दिसत नाही. कारण सू. ४.१५ नुसार संस्त्यैला संखा असा आदेश झाल्यावर, संखाय हे रूप साधले गेले आहे.
१.५७५ सुण्हा -- येथील 'हा' साठी सू.२.७५ पहा. थुवओ --
मधील 'थ' साठी सू.२.४५ पहा.
१.७८ गेज्झ -- ज्झ साठी सू.२.२६ पहा.
१.७९ दारं बारं -- द्वारमधील व् च्या लोपासाठी सू.२.७९ पहा. द् चा लोप
आणि व् चा ब होऊन बार हे रूप. कथं नेरइओ नारइओ -- नारकिक शब्दात, आ चा विकल्पाने ए होऊन, नेरइओ, नारइओ ही रूपे बनली नसल्यास, ती कशी बनली, असा येथे प्रश्न आहे.