________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४३७
खण्डित शब्दाकडे घ्यायचा नाही असे म्हटले तर 'वुन्द्रं वन्द्रं' या उदाहरणाऐवजी पाठभेदाने असणारे 'वुन्द्रं वन्द्रं हे उदाहरण घेऊन, णकारात नकार अंतर्भूत आहे, असे मानावे लागेल. त्रिविक्रम मात्र असे सांगतो :- चण्डखण्डिते णा वा। (१.२.१९) - चण्डखण्डितशब्दयोर्णकारेण सहितस्यादेर्वर्णस्य उद् भवति।
१.५४ वकाराकारस्य -- 'व' शी संपृक्त असणाऱ्या अकाराचा.
१.५५ पकारथकारयोरकारस्य -- प आणि थ यांच्याशी संपृक्त असणाऱ्या
अकाराचा. युगपत् -- एकाचवेळी; एकदम.
१.५६ ज्ञस्य णत्वे कृते -- ज्ञ चा ण केला असताना. प्राकृतात ज्ञ चे वर्णान्तर
ण (सू.२.४२) व ञ (सू.२.८३) असे होते. ज्ञ चे ण असे वर्णान्तर केले असताना, या सूत्रातील नियम लागतो.
१.५८ अच्छेरं.....अच्छरीअं -- आश्चर्य शब्दाची प्राकृतात अनेक वर्णान्तरे
होतात. सू.२.६६ नुसार र्य चा र आणि सू.२.६७ नुसार, र्य चे रिअ, अर आणि रिज होतात.
१.६१ विश्लेष -- (शब्दश:) वियोग. संयुक्त व्यंजनातील दोन अवयवांच्या
मध्ये स्वर घालून व्यंजने वेगळी करणे, संयुक्त व्यंजन घालविणे म्हणजे विश्लेष. यालाच स्वरभक्ती असेही म्हणतात. स्वरभक्तीसाठी सू.२.१००११५ पहा.
१.६३ ओप्पेइ -- (म) ओपणे. १.६५ नञः परे -- नञ्च्या पुढे. संस्कृतात नञ् (न) हे निषेधवाचक अव्यय
आहे.