________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४३१
१.२० दीहाऊ, अच्छरा -- दीर्घायुस् व अप्सरस् मधील अन्त्य व्यंजनाचा लोप
होऊन ही रूपे बनली आहेत.
१.२२ धणू -- धनुस् मधील अन्त्य व्यंजनाचा लोप होऊन हे रूप झाले.
१.२३ अनुस्वार -- स्वरानंतर ज्याचा उच्चार होतो, तो अनुस्वार. उदा. जलं
शब्दात अन्त्य अ नंतर अनुस्वाराचा उच्चार आहे. जलं....पेच्छ -- मागील शब्द (कर्म असल्याने) द्वितीयान्त आहेत, हे दाखविण्यास पेच्छ हे आज्ञार्थी रूप येथे वापरलेले आहे. पेच्छ हा दृश् धातूचा आदेश (सू.४.१८१) आहे. अनन्त्य -- अन्त्य नसणारा.
१.२४ सक्खं, जं, तं, वीसुं, पिहं, सम्मं - यांमध्ये अन्त्य व्यंजनांचा अनुस्वार
झालेला आहे. इहं इहयं -- येथे खरे म्हणजे अन्त्य व्यंजनांचा अनुस्वार झालेला नाही. इहं मध्ये ह वर अनुस्वारागम झालेला आहे. इहयं मध्ये, प्रथम इह पुढे स्वार्थे य येऊन, मग त्याचेवर अनुस्वारागम झाला आहे. आले?अं -- सू.२.१६४ पहा. येथे आश्लेष्टम् पुढे स्वार्थे अ (क) येऊन, अनुस्वाराचे स्थान बदलले आहे.
१.२६ आगमरूपोऽनुस्वारः -- आगम या स्वरूपात येणारा अनुस्वार. संयुक्त
व्यंजनांच्या संदर्भात अनुस्वारागमाबद्दल असे म्हणता येईल :- संयुक्त व्यंजनात एका अवयवाचा लोप झाल्यास, त्याचे स्थानी (कधी) अनुस्वार येतो. उदा. - वक्र - वक्क - वंक. अणिउँतयं अइमुंतयं -- सू. १.१७८ पहा. क्वचिच्छन्दपूरणेऽपि -- आवश्यक त्या मात्रा (वा गण) यांची पूर्तता करताना. उदा. देवं नागसुवण्ण मध्ये छंदासाठी 'व' या अक्षरावर अनुस्वार आला आहे.
१.२७ क्त्वाया: ....णसू -- क्त्वा हा पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय
साधण्याचा प्रत्यय संस्कृतमध्ये आहे. क्त्वाचे सू.२.१४६ नुसार जे आदेश