________________
४३२
टीपा
होतात, त्यांतील तूण आणि तुआण या आदेशांत ण आहे. स्यादि (सि+आदि) म्हणजे शब्दांना लागणारे विभक्तिप्रत्यय. (स्यादि या संज्ञेसाठी सू.३.२ वरील टीप पहा). विभक्तिप्रत्ययांपैकी तृतीया ए.व. आणि षष्ठी अ.व. यामध्ये ण आहे व सप्तमीच्या अ.व. प्रत्ययात सु आहे. काऊणं....काउआण -- कर धातू ची पू.का.धा.अ. (सू.२.१४६; ४.२१४). वच्छेणं वच्छेण - वच्छ शब्दाचे तृतीया ए.व. करिअ - कर धातूचे पू.का.धा.अ.(सू.२.१४६; ३.१५७). अग्गिणो - अग्गि शब्दाचे प्रथमा अ.व. (सू. ३.२२-२३).
१.२९ इआणि....दाणिं - ही इदानीम् शब्दाची वर्णान्तरे आहेत.
१.३० अनुस्वारस्य वर्गे परे - अनुस्वाराच्या पुढे वर्गीय व्यंजन असता. येथे वर्ग
म्हणजे वर्गीय व्यंजन. व्यंजनांच्या वर्गासाठी सू.१.१ वरील टीप पहा. प्रत्यासत्ति -- सांनिध्य, सामीप्य. वर्गस्यान्त्यः -- (त्या त्या) वर्गातील अन्त्य व्यंजन (ङ्, ञ्, ण, न् व म्).
१.३१-३६ प्राकृतमध्ये शब्दांची लिंगे प्राय: संस्कृतप्रमाणेच असतात. तरी काही
शब्दांची लिंगे प्राकृतात बदलली आहेत. त्यांचा विचार या सूत्रांमध्ये आढळतो.
१.३१ पुंसि -- पुल्लिंगात.
१.३२ सान्तम्, नान्तम् -- स् तसेच न् या व्यंजनाने अन्त पावणाऱ्या शब्दांची
रूपे :- उदा. यशस्; जन्मन्.
१.३३ अच्छीई -- हे नपुं.रूप आहे (सू.३.२६). अञ्जल्यादिपाठात् --
'अञ्जलि' हा शब्द आदि (प्रथम) असणारा शब्दांचा एक विशिष्ट समूह वा गण अथवा वर्ग. या गणातील शब्द सू.१.३५ वरील वृत्तीमध्ये दिले