SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 431
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४३० टीपा १.१२ श्रद् -- हे एक अव्यय असून, ते प्रायः धा या धातूच्या पूर्वी येते. उद् -- धातूचे पूर्वी येणारा उद् हा एक उपसर्ग आहे. १.१३ निर् दुर् -- धातूपूर्वी येणारे हे दोन उपसर्ग आहेत. वा -- विकल्प दाखविणारे अव्यय. दुक्खिओ-- दुःखित मध्ये दुर् मधील र् चा विसर्ग झाला आहे. १.१४ अन्तरो ..... न भवति -- अंतर्, निर् आणि दुर् यातील अन्त्य र पुढे येणारा स्वर त्या र मध्ये मिसळून जातो. अन्तर् -- हे एक अव्यय असून, ते धातू किंवा नाम यांना जोडून येऊ शकते. अन्तोवरि - (अन्तर्+उपरि) येथे अन्तर् मधील र् पुढे स्वर असूनही, र् चा लोप झाला आहे. १.१५-२१ या सूत्रांत सांगितलेला विचार पुढीलप्रमाणे सांगता येईल :- विद्युत् शब्द सोडून, इतर काही व्यंजनान्त स्त्रीलिंगी शब्दांत, अन्ती आ हा स्वर मिसळून मग वर्णान्तर होते. उदा. सरित्+आ = सरिता= (सू.१.१७७ नुसार) सरिआ. याचप्रमाणे पाडिवआ, संपआ (सू.१.१५). असाच प्रकार रेफान्त शब्दांच्या बाबतीत. उदा. गिरा, धुरा, पुरा (सू.१.१६). याचप्रमाणे छुहा (सू.१.१७), दिसा (सू.१.१९), अच्छरसा (सू.१.२०), व कउहा (सू.१.२१) ही वर्णान्तरे होतील. आता, जे व्यंजनान्त शब्द प्राकृतात पुल्लिंगी आहेत, त्यापैकी काहींच्या अन्ती अ हा स्वर मिसळून वर्णान्तर होते. उदा. शरद्+अ = शरद = सरअ. याचप्रमाणे भिसओ (सू.१.१८), पाउसो (सू.१.१९) व दीहाउस (सू.१.२०). १.१५ स्त्रियाम् -- स्त्रीलिंगात. ईषत्स्पृष्टतरयश्रुति -- सू.१.१८० पहा. १.१६ रेफ -- र् हा वर्ण आदेश -- एखादा वर्ण वा शब्द यांचे स्थानी येणारा अन्य वर्ण अथवा शब्द.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy