________________
४२८
टीपा
श्लोक १:- नखाच्या क्षतांनी युक्त अशा अंगावर कंचुक परिधान करणाऱ्या वधूच्या संदर्भात (ती नखक्षते) मदन बाणाच्या सतत धारांनी केलेल्या जखमां (छेदां) प्रमाणे दिसतात. या श्लोकात ल्लिहणे मधील ए आणि पुढील आ यांचा संधी झाला नाही. श्लोक २:- हत्तीच्या पिलाच्या दातांची कांती ज्याला उपमा देण्यात अपुरी पडते (अपज्जत्त) असे हे (तुझे) उरूयुगल आता चिरडलेल्या कमलदेठाच्या दंडाप्रमाणे विरस असे आम्हाला दिसते. या श्लोकात, लक्खिमो मधील ओ चा पुढील स्वराशी संधी झालेला नाही. अहो अच्छरिअं -- येथे हो मधील ओ चा पुढील स्वराशी संधी झालेला नाही. श्लोक ३:- अर्थाचा विचार करण्यात तरल (बेचैन) झालेल्या, इतर (सामान्य) कवींच्या बुद्धी भ्रम पावतात. (पण) कविश्रेष्ठांच्या मनात (मात्र) अर्थ विनायास येतात. या श्लोकात, अत्थालोअण मध्ये अत्थ आणि आलोअण आणि कइंदाणं मध्ये कइ व इंद, यांचा संधी झाला आहे. व्यञ्जन -- स्वरेतर वर्ण. स्वरांच्या साहाय्याविना व्यंजनांचा पूर्ण उच्चार होत नाही. व्यंजनांच्या उच्चाराला अर्धमात्रा इतका काळ लागतो (व्यञ्जनं चार्धमात्रिकम्) उध्दृत्त -- शब्दातील व्यंजनाचा लोप होऊन उरणारा स्वर. उदा. 'गति' मध्ये सू.१.१७७ नुसार त् चा लोप झाल्यावर जो इ हा स्वर उरतो, तो उद्धृत्त स्वर होय. श्लोक १:- हा श्लोक विन्ध्यवासिनी देवतेला उद्देशून आहे. त्याचा अर्थ नीटसा स्पष्ट नाही. अर्थ असा :- बळी दिल्या जाणाऱ्या महापशू (मनुष्या) च्या दर्शनाने निर्माण झालेल्या संभ्रमामुळे एकमेकांवर चढलेल्या, तुझ्या चित्रातील देवता आकाशातच गंध द्रव्याचे गृह करतात. (या श्लोकाचा संदर्भ गउडवह ३१९ आहे. तेथे टीकाकार सांगतो :- महापशुः मनुष्यः; परस्परम् आरूढा अन्योन्योत्कलितशरीराः; गन्धकुटी गन्धद्रव्यगृहम् ; कौलनार्यः चित्रन्यस्तदेवताविशेषाः। कौलनार्यः म्हणजे शाक्तपंथी स्त्रिया असाही अर्थ होईल). या श्लोकात, गंध-उडिं या शब्दात, उ या उद्धत्त
१.८