________________
प्राकृत व्याकरणे-प्रथम पाद
४२७
पडता, फक्त काही उदाहरणांना निश्चितपणे लागू पडणारा व काहींना अवश्य लागू न पडणारा विकल्प म्हणजे व्यवस्थित विभाषा. बहलाधिकारात् -- बहुलचा अधिकार असल्यामुळे. बहुलसाठी सू.१.२ वरील टीप पहा. काही -- काहिइ मध्ये हि मधील इ व पुढील इ यांचा संधी 'ही' असा झाला. काहिइ या रूपासाठी सू.३.१६६ पहा. बीओ -- बिइओ मध्ये बि मधील इ व पुढील इ यांचा बी असा संधी झाला.
१.६ इवर्णस्य उवर्णस्य -हे शब्द सूत्रातील युवर्णस्य शब्दाचा अनुवाद आहेत.
इवर्ण म्हणजे इ व ई हे वर्ण. उवर्ण म्हणजे उ आणि ऊ हे वर्ण. अस्वे वर्णे परे -- विजातीय (अस्व) वर्ण (स्वर) पुढे असतांना. अ-आ, इ-ई, उऊ या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत; आणि त्या परस्परात विजातीय आहेत. उदा. अ व इ हे विजातीय होतात. उदाहरणांमध्ये :- वि अवयासो आणि वंदामि अज्ज येथे मागील इ व पुढील अ यांचा संधी झालेला नाही. श्लोक १ :- दानवश्रेष्ठाच्या रक्ताने लिप्त झालेला व नखांच्या प्रभासमूहाने अरुण झालेला विष्णू, संध्या (रूपी) वधूने आलिंगिलेल्या व वीजेच्या निकट संबंधात असणाऱ्या नूतन मेघाप्रमाणे, शोभून दिसतो. या श्लोकात, सहइ आणि इंदो, ०प्पहावलि आणि अरुणो, वह आणि अवऊढो या मागील व पुढील विजातीय स्वरांचा संधी झालेला नाही. श्लोक २ :- उदरामध्ये दडलेल्या रक्त कमलाच्या मागे लागलेल्या भ्रमरांच्या पंक्तीप्रमाणे. या श्लोकपंक्तीत, गूढ आणि उअर यांचा गूढोअर व तामरस आणि अणुसारिणी यांचा तामरसाणुसारिणी, असा संधी झाला आहे. पुहवीसो -- येथे पुहवीमधील ई व ईस मधील ई या सजातीय स्वरांचा संधी झाला आहे.
१.७ एकार-ओकारयोः - ए आणि ओ यांचा. एखाद्या वर्णाचा निर्देश
करताना, त्याच्यापुढे कार हा शब्द जोडला जातो. उदा. एकार. स्वर - - स्वयं राजन्ते इति स्वराः। स्वरांचा उच्चार स्वयंपूर्ण असतो.