________________
४२६
टीपा
असतो, तो शब्द पुढील सूत्रांत अनुवृत्तीने येतो व त्या सूत्रांचा अर्थ करताना, तो शब्द अध्याहृत घेतला जातो.
१.३ आर्षं प्राकृतम् - आर्ष हा शब्द 'ऋषि' या शब्दापासून साधलेला आहे.
आर्ष प्राकृत या शब्दाने हेमचंद्राला अर्धमागधी ही प्राकृतभाषा अभिप्रेत आहे (सू.४.२८७ पहा). अर्धमागधी ही श्वेतांबर जैनांच्या आगमग्रंथांची भाषा आहे. अर्धमागधीला महाराष्ट्रीचे सर्व नियम विकल्पाने लागू पडतात.
१.४ वृत्तौ – वृत्तीमध्ये ; येथे समासामध्ये, असा अर्थ आहे. 'वृत्ति' म्हणजे मिश्र
पद्धतीने बनलेला शब्द. वृत्तीचा अर्थ स्पष्ट होण्यास स्पष्टीकरण आवश्यक असते. संस्कृतमध्ये पाच वृत्ती आहेत; त्यापैकी समास ही एक वृत्ती आहे. समासे....भवत: -- समासात किमान दोन पदे असतात. समासातील पहिल्या पदाचा अन्त्य दीर्घ किंवा हस्व स्वर हा बहुलत्वाने ह्रस्व किंवा दीर्घ होतो. उदा. अन्तावेई या समासात, अन्त या पहिल्या पदाचा अन्त्य स्वर दीर्घ झाला आहे. सत्तावीसा यांतही हाच प्रकार आहे. वारीमई - - वारिणिः मतिः यस्य सः; किंवा वारि इति मतिः।
संस्कृतोक्तः सन्धिः सर्वः - प्राकृतात विसर्ग नाही व व्यंजनान्त शब्द नाहीत. त्यामुळे त्यांच्या संधींचा स्वतंत्र विचार प्राकृतात नाही. तेव्हा फक्त स्वरसंधीचा विचार आवश्यक ठरतो. सन्धिः-- ज्यांचे परम निकट सान्निध्य झाले आहे, अशा वर्णांचे संधान (मिलाप) म्हणजे संधी. पदयोः -- दोन पदांमध्ये. विभक्तिप्रत्यय किंवा धातूंना लागणारे प्रत्यय लागून बनलेला शब्द म्हणजे पद. उदा. रामेण; करोति. वासेसी मध्ये वास मधील अन्त्य अ व पुढील इ, विसमायवो मध्ये विसम मधील अन्त्य अ व पुढील आ, दहीसरो मध्ये दहिमधील अन्त्य इ व पुढील ई, साऊअयं मध्ये साउ मधील उ आणि पुढील उ, यांचा संधी झाला आहे. दहीसरो -- दधिप्रधान: ईश्वरः। व्यवस्थितविभाषया - विभाषा म्हणजे विकल्प. आता, ज्याच्यासाठी विकल्प सांगितला, त्याच्या सर्व उदाहरणांना लागू न