________________
प्राकृत
व्याकरणे
- प्रथम पाद
अस्वरं... ..... न भवति संयुक्त व्यंजनात (उदा. अक्क, चित्त ) पहिला अवयव म्हणून स्वर-रहित (अस्वर) व्यंजन असते व ते प्राकृतात चालते; पण स्वररहित केवळ व्यंजन (उदा. सरित् वाच् मधील त्, च् याप्रमाणे) प्राकृतात अन्त्य स्थानी असू शकत नाही. थोडक्यात म्हणजे प्राकृतमध्ये व्यंजनाने अन्त पावणारे शब्द नाहीत.
——
——
द्विवचन
संस्कृतमध्ये शब्द व धातू यांची रूपे एक, द्वि आणि बहु अशा तीन वचनांत होतात. प्राकृतात मात्र द्विवचन नाही; तेव्हा कुठल्याच शब्दाची द्विवचनाची रूपे प्राकृतात नाहीत. द्विवचनाचे कार्य अनेक वचनाने (सू. ३.१३०) केले जाते.
४२५
——
चतुर्थी बहुवचन प्राकृतात चतुर्थी विभक्ती ही बहुतांशी लुप्त झाली आहे. चतुर्थीचे कार्य षष्ठी विभक्तीने (सू. ३.१३१) केले जाते. तेव्हा या ठिकाणी, चतुर्थी बहुवचन प्राकृतात नाही, असे म्हणण्याचे कारण असे :प्राकृतात क्वचित् चतुर्थी एकवचनाची रूपे आढळतात (सू.४.४४८.१ पहा) पण चतुर्थी ब.व. ची रूपे आढळत नाहीत.
:
१.२ बहुलम् - म्हणजे बाहुलक. बहुल म्हणजे तांत्रिकदृष्ट् क्वचित् प्रवृत्तिः क्वचिदप्रवृत्तिः क्वचिद् विभाषा क्वचिदन्यदेव | शिष्टप्रयोगाननुसृत्य लोके विज्ञेयमेतद् बहुलग्रहेषु ।।
'प्रवृत्ति' म्हणजे नियमाची योग्यप्रकारे कार्य प्रवृत्ती; तिचा अभाव म्हणजे अप्रवृत्ती; विभाषा म्हणजे विकल्प; क्वचित् नियमात सांगितल्यापेक्षा काहीतरी वेगळेच कार्य (अन्यत्) होते; या सर्व गोष्टी बहुलने सूचित होतात. आता, प्राकृत हे बहुल आहे; त्यामुळे प्राकृत व्याकरणाच्या नियमांना अनेक अपवाद, विकल्प इ. असतात.
अधिकृतं वेदितव्यम् बहुलम् हे अधिकारसूत्र आहे असे जाणावे. ज्या सूत्रातील पद वा पदे पुढे येणाऱ्या अनेक सूत्रांतील पदांशी संबंधित असतात, ते अधिकारसूत्र होय. अधिकार ही प्रदीर्घ अनुवृत्ती आहे; पण अनुवृत्तीपेक्षा त्याचे क्षेत्र अधिक व्यापक असते. ज्या शब्दाचा अधिकार
——