________________
४२४
——
जातात. ज्याच्या उच्चाराला एक मात्रा ( = अक्षिस्पन्दनप्रमाणः कालः) लागते, तो ऱ्हस्व स्वर; ज्याच्या उच्चाराला दोन मात्रा लागतात, तो दीर्घ; आणि ज्याच्या उच्चाराला तीन मात्रा लागतात, तो प्लुत स्वर होय. वर्णसमाम्नाय - वर्णमाला वा वर्णसमूह. प्राकृतमधील वर्ण पुढीलप्रमाणे सांगता येतील :- स्वर :- -हस्व :- अ, इ, उ, ए, ओ; दीर्घ :- आ, ई, ऊ, ए, ओ (काहींच्या मते प्राकृतात ऐ, व, औ हे स्वर आहेत). व्यंजने :- क्, ख्, ग्, घ् (ङ्) (कवर्ग); च् छ् ज् झ् (ञ् ) ट्, ठ्, ड्, ढ्, ण् (टवर्ग); त्, थ्, द्, ध्, न् (तवर्ग); प्, फ्, ब्, भ्, म् (पवर्ग); य्, र्, ल्, व् (अंतस्थ); स् (ऊष्म); ह् (महाप्राण). ङञौ.... भवत एव माहाराष्ट्री प्राकृतात ङ् आणि ञ् ही व्यंजने स्वतंत्रपणे येत नाहीत. ( मागधी - पैशाची भाषांत मात्र ञ चा वापर दिसतो. सू.४.२९३-२९४, ३०४ - ३०५ पहा). मात्र ती आपल्याच वर्गातील व्यंजनांशी संयुक्त असली तर ती चालतात; पण या संयोगातही ङ् व ञ् हे प्रथम अवयवच असतात. उदा. अङ्क, चञ्चु.
(चवर्ग)
ऐदौतौ ऐत् आणि औत् म्हणजे ऐ व औ हे स्वर. येथे ऐ व औ पुढे तकार जोडला आहे. ज्या वर्णांच्या पुढे वा मागे तकार जोडला जातो, अशा वर्णांचा उच्चार करण्याला लागणाऱ्या वेळे इतकाच वेळ लागणाऱ्या सवर्ण वर्णांचा निर्देश त्या वर्णाने होतो. व्यवहारतः ऐत् म्हणजे ऐ, औत् म्हणजे औ म्हणण्यास हरकत नाही. याचप्रमाणे पुढेही अत् (१.१८), आत् (१.६७), इत् (१.८५), ईत् (१.९९), उत् (१.८२), ऊत् (१.७६), ऋत् (१.१२६), एत् व ओत् (१.७) इत्यादी ठिकाणी जाणावे. कैतवम् .... कोरवा येथे प्रथम संस्कृत शब्द व लगेच त्याचे प्राकृतमधील वर्णान्तरित रूप दिलेले आहे. वर्णान्तरे देताना हेमचंद्राने भिन्न पद्धती वापरल्या आहेत. कधी तो प्रथम संस्कृत शब्द व मग त्याचे वर्णान्तरित रूप देतो. उदा. सू. १.३७, ४३ इ. कधी तो प्रथम प्राकृतमधील वर्णान्तरित रूपे देतो; व मग क्रमाने त्यांचे संस्कृत प्रतिशब्द देतो. उदा. १.२६, ४४ इ. कधी तो फक्त प्राकृतमधील वर्णान्तरित रूपे देतो; त्यांचे संस्कृत प्रतिशब्द देतच नाही. उदा. १.१७३, १७७, १८० इ.
-:
——
-
टीपा
——