________________
प्राकृत व्याकरणे- प्रथम पाद
——
लिग
असतात. उदा. देव (पु.), देवी (स्त्री.), नाम (नपुं.).
कारक
वाक्यात क्रियेशी जे संबंधित असते, ते कारक. संस्कृतमध्ये कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण अशी सहा कारके आहेत.
-
——
समास अनेक पदे एकत्र येऊन अर्थदृष्ट्या होणारे एक पद. उदा.
राममंदिर (रामाचे मंदिर ) .
संज्ञा शास्त्रातील पारिभाषिक शब्द. एकाद्या शास्त्रात काही विशिष्ट शब्द विशिष्ट अर्थाने वापरले जातात; त्या सर्व संज्ञा होत. पुष्कळ अर्थ संक्षेपाने सांगण्यास संज्ञांचा उपयोग होतो. उदा. गुण, वृद्धि इ. लोकात् -- प्राकृतमधील वर्ण हे बहुतांशी संस्कृतवरूनच घेतलेले आहेत. संस्कृतमधले जे वर्ण प्राकृतात नाहीत (आणि जे अधिक वर्ण प्राकृतात आहेत), त्यांची माहिती लोकांकडून - लोकांच्या भाषेतील वापरावरून - करून घ्यावयाची आहे. त्रिविक्रमही असेच सांगतो ऋलृवर्णाभ्याम् ऐकारौकाराभ्याम् असंयुक्त - ङ - ञ - काराभ्यां शषाभ्यां द्विवचनादिना च रहित: शब्दोच्चारो लोकव्यवहाराद् एव उपलभ्यते। १.१.१ ..... वर्णसमाम्नाय :- संस्कृतमधील जे वर्ण प्राकृतात नाहीत, ते वर्ण असणारे संस्कृत शब्द योग्य ते विकार होऊन, मगच प्राकृतात येतात. उदा. ऋ चे इ इत्यादी विकार होतात. ऋ चे विकार १.१२६१४४, लृ चे विकार १. १४५, ऐ चे विकार १.१४८-१५५ व औ चे विकार १.१५६-१६४ येथे सांगितलेले आहेत. ङ् आणि ञ् ही व्यंजने संपूर्णपणे प्राकृतात नाहीत असे नाही. कारण हेमचंद्रच पुढे सांगतोङञौ... .... भवत एव श् व ष् या व्यंजनांचा माहाराष्ट्री प्राकृतात प्रायः स् होतो (सू.१.२६०). (मागधी भाषेत मात्र श् व ष् व्यंजनांचा वापर दिसतो. सू. ४.२८८, २९८ पहा).
ऋऋ...
विसर्जनीय म्हणजे विसर्ग. वस्तुतः विसर्ग स्वतंत्र वर्ण नसून, अन्त्य र् किंवा स् या व्यंजनांचा तो एक विकार आहे. प्लुत लागणाऱ्या कालानुसार, स्वरांचे हस्व, दीर्घ व प्लुत असे तीन प्रकार केले
उच्चाराला
——
४२३
शब्दाचे लिंग. शब्द हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी
:
——