________________
४२०
चतुर्थः पादः
(वृत्ति) (प्राकृत इत्यादि भाषांच्या बाबतीत) उरलेले (कार्य) (म्हणजे) जे (या)
आठव्या (अध्याया) मध्ये प्राकृत इत्यादि भाषांच्या बाबतीत सांगितले (गेले) नाही, ते (पहिल्या) सात अध्यायांत ग्रथित केलेल्या संस्कृत (भाषे) प्रमाणेच सिद्ध होते. (म्हणजे असे :-) हे?....पुहवी ।।१।।. येथे, चतुर्थीचा आदेश सांगितलेला नाही, तो (या श्लोकात) संस्कृतप्रमाणेच सिद्ध होतो. (प्राकृत इत्यादि भाषांच्या बाबतीत या आठव्या अध्यायात जे काही कार्य) सांगितले सुद्धा आहे ते (कार्य) सुद्धा क्वचित् संस्कृतप्रमाणेच होते. उदा. जसे (माहाराष्ट्री) प्राकृत भाषेत, सप्तमी एकवचनी प्रत्ययाने अन्त पावणाऱ्या उरस् या शब्दाचे उरे व उरम्मि असे प्रयोग होतात, तसाच क्वचित् उरसि असा सुद्धा प्रयोग होतो. याचप्रमाणे (इतर काही शब्दांच्या बाबतीतही होते. उदा.) सिरे सिरम्मि, सिरसि; सरे सरम्मि, सरसि. (सूत्रातील) सिद्ध शब्दाचा निर्देश मंगलार्थी आहे. त्यामुळे (नक्की) आयुष्य, श्रोतृकता आणि अभ्युदय (या गोष्टी प्राप्त होतात).
इत्याचार्यश्रीहेमचन्द्रविरचितायां सिद्धहेमचन्द्राभिधानस्वोपज्ञशब्दानुशासनवृत्तावष्टमस्याध्यायस्य
चतुर्थः पादः समाप्तः ।।
( आठव्या अध्यायाचा चतुर्थ पाद समाप्त झाला )
( येथे हेमचंद्रकृत प्राकृतव्याकरण हा ग्रंथ समाप्त झाला )
।। शुभं भवतु
॥