________________
प्राकृत व्याकरणे
इत्यादि संस्कृतातल्याप्रमाणेच आहेत, असे जाणावे. आणि ‘लोकांकडून' (=लोकांचे व्यवहारावरून), हेही (येथे अध्याहृत) आहे. त्यामुळे ऋ, ऋ, लु, लु, ऐ व औ, ङ्, अ, श् आणि ए, विसर्ग आणि प्लुत हे सोडून, (प्राकृतातील इतर) वर्ण-समूह हा लोकांच्या व्यवहारावरूनच जाणून घ्यावयाचा आहे. आपल्या वर्गातील व्यंजनाशी संयुक्त असणारे ङ् आणि ञ् (हे वर्ण प्राकृतमध्ये) आहेतच. आणि काहींच्या मते, ऐ आणि औ (हे स्वरही प्राकृतमध्ये आहेत). उदा. कैतवम्....कौरवा. त्याचप्रमाणे स्वररहित व्यंजन, द्विवचन आणि चतुर्थी बहुवचन (हेही प्राकृतात) नाहीत.
(सूत्र) बहुलम् ।।२।। (वृत्ति) बहुलम् इत्यधिकृतं वेदितव्यम् आशास्त्रपरिसमाप्तेः। ततश्च क्वचित्
प्रवृत्तिः क्वचिद् अप्रवृत्तिः क्वचिद् विभाषा क्वचिद् अन्यदेव भवति।
तच्च यथास्थानं दर्शयिष्यामः। (अनु.) (प्रस्तुतचे व्याकरण-) शास्त्र संपेपर्यंत, बहलं (या सूत्रा) चा अधिकार
आहे, असे जाणावे. आणि त्यामुळे (या शास्त्रात सांगितलेल्या नियम, इत्यादींची) क्वचित् प्रवृत्ति होते, क्वचित् (तशी) प्रवृत्ति होत नाही, क्वचित् विकल्प येतो, तर क्वचित् (नियमात सांगितल्यापेक्षा) वेगळेच असे काहीतरी (रूप किंवा वर्णान्तर) होते. आणि ते आम्ही (त्या त्या) (योग्य) ठिकाणी दाखवू.
(सूत्र) आर्षम् ॥३॥ (वृत्ति) ऋषीणाम् इदं आर्षम्। आर्ष प्राकृतं बहुलं भवति। तदपि यथास्थानं
दर्शयिष्यामः। आर्षे हि सर्वे विधयो विकल्प्यन्ते। (अनु.) ऋषींचे हे (ते) आर्ष (प्राकृत) होय. आर्ष प्राकृत हे बहुल आहे. ते सुद्धा
आम्ही (त्या त्या) योग्य ठिकाणी दाखवू. (या व्याकरणात दिलेले) सर्व नियम आर्ष प्राकृतात विकल्पाने लागतात.