________________
आचार्य श्री हेमचंद्रकृत प्राकृत व्याकरण
प्रथम पाद
(सूत्र) अथ प्राकृतम् ।।१।। (वृत्ति) अथशब्द आनन्तर्यार्थोऽधिकारार्थश्च। प्रकृति: संस्कृतम्। तत्र भवं
तत आगतं वा प्राकृतम्। संस्कृतानन्तरं प्राकृतमधिक्रियते। संस्कृतानन्तरं च प्राकृतस्यानुशासनं सिद्धसाध्यमानभेदसंस्कृतयोनेरेव तस्य लक्षणं न देश्यस्य इति ज्ञापनार्थम्। संस्कृतसमं तु संस्कृतलक्षणेनैव गतार्थम्। प्राकृते च प्रकृतिप्रत्ययलिङ्गकारकसमाससंज्ञादय: संस्कृतवद् वेदितव्याः। लोकाद् इति च वर्तते । तेन ऋऋलुलुऐऔङञशषविसर्जनीयप्लुतवलुं वर्णसमाम्नायो लोकाद् अवगन्तव्यः। औ स्ववर्यसंयुक्तौ भवत एव। ऐदौतौ च केषाश्चित्। कैतवम् कैअवं। सौन्दर्यम् सौंअरिअं। कौरवाः कौरवा। तथा अस्वरं व्यञ्जनं द्विवचनं
चतुर्थीबहुवचनं च न भवन्ति। (अनु.) (सूत्रातील) अथ हा शब्द नंतर हा अर्थ आणि (नवीन विषयाचा) आरंभ
हा अर्थ, असे दोन अर्थ दाखविण्यास योजलेला आहे. प्रकृति म्हणजे संस्कृत (भाषा) होय. तेथे (=संस्कृतमध्ये) झालेले किंवा तेथून (=संस्कृतमधून) आलेले (म्हणजे उत्पन्न झालेले) ते प्राकृत होय. संस्कृतनंतर प्राकृतचा आरंभ केला जातो. सिद्ध आणि साध्यमान असे (दोन प्रकारचे) भिन्न शब्द असणारे संस्कृत हेच ज्याचे मूळ (योनि) आहे, (ते प्राकृत), असे त्या प्राकृतचे लक्षण आहे, (आणि हे लक्षण) देश्य प्राकृतचे लक्षण नव्हे, या (गोष्टी) चा बोध करून देण्यास, संस्कृतनंतर प्राकृतचे विवेचन (असे म्हटले आहे). तथापि जे प्राकृत संस्कृत-सम आहे, ते (मागे सांगितलेल्या) संस्कृत व्याकरणावरूनच कळून आलेले आहे. आणि प्राकृतमध्ये प्रकृति, प्रत्यय, लिंग, कारक, समास, संज्ञा,