________________
प्राकृत व्याकरणे
शब्दाच्या निर्देशामुळे (असलेच इतर चेष्टानुकरणी शब्द जाणावयाचे आहेत. उदा.) सिरि...उट्ठबईस ।।४।। ; इत्यादि.
(सूत्र) घइमादयोऽनर्थकाः ।। ४२४ ।।
(वृत्ति) अपभ्रंशे घइमित्यादयो निपाता अनर्थकाः प्रयुज्यन्ते । अम्मडि? पच्छायावडा पिउ कलहिअउ विआलि । घइं विवरीरी बुद्धडी होड़ विणासहों कालि ॥१॥ आदिग्रहणात् खाइं इत्यादयः ।
(अनु.) अपभ्रंश भाषेत घई इत्यादि निपात (अव्यये) निरर्थक (विशेष अर्थ अभिप्रेत नसताना) वापरले जातात. उदा. अम्मडि... कालि ।। १ ।। . ( सूत्रातील) आदि शब्दाच्या निर्देशामुळे खाइं इत्यादि शब्दसुद्धा (निरर्थकपणे वापरले जातात हे जाणावयाचे आहे).
( सूत्र ) तादर्थ्ये केहिं - तेहिं - रेसि - रेसिं-तणेणा: ।। ४२५ ।।
(वृत्ति) अपभ्रंशे तादर्थ्ये द्योत्ये केहिं तेहिं रेसि रेसिं तणेण इत्येते पञ्च निपाताः
प्रयोक्तव्याः।
१
४०७
ढोल्ला ऍह परिहासडी अइ भण कवणहिँ देसि ।
हउँ झिज्जउँ तउ केहिँ पिअ तुहुँ पुणु अन्नहि रेसि ।।१।। एवं तेहिं-रेसिमावुदाहार्यौ । वड्डत्तणों तणेण । ( ४.३६६.१)। (अनु.) अपभ्रंश भाषेत तादर्थ्य (त्या साठी असा अर्थ ) दाखवावयाचा असताना, केहिं, तेहिं, रेसि, रेसिं आणि तणेण हे पाच निपात वापरावेत. उदा. ढोल्ला...रेसि ।।१।।. याचप्रमाणे तेहिं व रेसिं यांची उदाहरणे घ्यावीत. (तणेण चे उदाहरण:-) वत्तणों तणेण .
अम्ब पश्चात्तापः प्रियः कलहायितः विकाले । ( नूनं) विपरीता बुद्धिः भवति विनाशस्य काले ।
२ विट एष परिहासः अयि भण कस्मिन् देशे।
अहं क्षीणा तव कृते प्रिय त्वं पुनः अन्यस्याः कृते ।।