________________
प्राकृत व्याकरणे
३८७
अनादाविति किम् ? सबधु करेप्पिणु। अत्र कस्य गत्वं न भवति। स्वरादिति किम् ? गिलि गिलि राहु मयंकु। असंयुक्तानामिति किम् ? एक्कहिं अक्खिहिं सावणु (४.३५७.२)। प्रायोधिकारात्क्वचिन्न भवति। जई. केवँइ पावीसु पिउ अकिआ कुड्ड करीसु। पाणिउ नवइ सरावि जिवँ सव्वंगें पइसीसु ।।४।। उअ कणिआरु पफुल्लिअउ कञ्चण-कन्ति-पयासु।
गोरी-वयण-विणिज्जिअउ नं सेवइ वण-वासु ।।५।। (अनु.) अपभ्रंश भाषेत अपदादि असणाऱ्या (म्हणजे पदाच्या प्रारंभी नसणा-या)
स्वराच्या पुढे असणाऱ्या, असंयुक्त क,ख,त,थ,प आणि फ यांचे स्थानी अनुक्रमे ग,घ,द,ध,ब आणि भ (हे वर्ण) प्रायः येतात. उदा. क च्या (स्थानी) ग :- जं दिट्ठउँ...मयंकु ।।१।।. ख च्या (स्थानी) घ :अम्मीए...अप्पाणु ।।२।।. त,थ,प आणि फ यांचे (स्थानी) द,ध,ब आणि भ :- सबधु...धम्मु ।।३।।. (सूत्रात) अनादि असणाऱ्या असे का म्हटले आहे ? (कारण जर क इत्यादि अनादि नसतील तर हा नियम लागत नाही. उदा.) सबधु करेप्पिणु; येथे (क अनादि नसल्याने) क चा ग होत नाही. स्वरापुढे असणाऱ्या (क इत्यादींचा) असे का म्हटले आहे ? (कारण क इत्यादि स्वरांपुढे नसल्यास हा नियम लागत नाही. उदा.) गिलि...मयंकु. असंयुक्त असणाऱ्या (क इत्यादींचा) असे का म्हटले आहे ? (कारण क इत्यादि संयुक्त असल्यास हा नियम लागत नाही. उदा.) एक्कहिं...सावणु. प्राय:चा अधिकार असल्यामुळे क्वचित् (क इत्यादींच्या स्थानी ग इत्यादि) होत नाहीत. उदा. जइ केवइ...वणवासु ।।४।। व ।।५।।.
१ यदि कथंचित् प्राप्स्यामि प्रियं अकृतं कौतुकं करिष्यामि ।
पानीयं नवके शरावे यथा सर्वाङ्गेण प्रवेक्ष्यामि ।। २ पश्य कर्णिकार: प्रफुल्लितकः काञ्चनकान्तिप्रकाशः।
गौरीवदनविनिर्जितक: ननु सेवते वनवासम्।।